उत्तर महाराष्ट्र

भाजप, कॉंग्रेस युतीचा जि. प. अध्यक्ष होणार 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसच्या युतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल. सत्तेत सहभागी होणाऱ्या कॉंग्रेसला गेल्या वेळेप्रमाणे सभापतिपद देण्यात येईल. तसेच गेल्यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातील अध्यक्ष झाला होता. आता रावेर लोकसभा मतदारसंघाचा होईल. हे आमचं अगोदरच ठरल आहे, अशी माहिती भाजप नेते व माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आज जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. माजीमंत्री एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खासदार रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार हरिभाऊ जावळे, अशोक कांडेलकर, राजेंद्र फडके, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते. 


श्री. खडसे यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. भाजपकडे 33 सदस्य आहेत. तसेच अमळनेर एक सदस्य पक्षाबरोबर आहे. त्यामुळे एकूण 34 सदस्य आहेत. या शिवाय कॉंग्रेसचे चार सदस्यही पक्षाबरोबर आहेत. पक्षाचे पोपट तात्या भोळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनीही सत्तेत सहभागी होण्याची सहमती दर्शविली आहे. 

अध्यक्षपद रावेर लोकसभेकडे 
जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत बोलताना खडसे म्हणाले की, गेल्या वेळी जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, सभापतिपद जळगाव लोकसभेकडे होत. आता हे अध्यक्षपद व दोन सभापतिपद रावेर लोकसभा मतदारसंघाकडे राहणार आहेत. उपाध्यक्ष व एकसभापतीपद जळगाव लोकसभा मतदारसंघाकडे राहणार आहे. हे आमच अगोदरच ठरल होते. त्यानुसारच आता ही पदे देण्यात येणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत पदांच्या नावाबाबत चर्चा करण्यात येईल. 

चार सदस्य अनुपस्थित 
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेत 33 सदस्य आहेत. आजच्या बैठकीला 29 सदस्य उपस्थित होते. चार सदस्य गैरहजर होते. त्यातील दोन अमळनेरचे आहेत. याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, सर्व सदस्य भाजपसोबत आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कातही आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT