उत्तर महाराष्ट्र

खानदेशातून 25 कोटी 75 लाखांचा ऑनलाइन भरणा 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः वीजग्राहकांना कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून घरबसल्या बिल भरण्याची ऑनलाइन सुविधा "महावितरण'ने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे "महावितरण'ची ऑनलाइन बिलवसुली वाढली आहे. यामुळे गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत खानदेशातून साधारण दोन लाख ग्राहकांकडून 25 कोटी 75 लाख रुपयांचा भरणा झाला आहे. 
"महावितरण'ने वीजग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून देताना संकेतस्थळासोबत मोबाईल ऍपची सुविधा दिली आहे. या सुविधांमुळे वीजबिले ऑनलाइन भरण्याकडे कल वाढत चालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अर्थात मार्च म्हटला म्हणजे वसुलीसाठी पथक नेमून यांच्याद्वारे वसुली करण्यात येत असते. परंतु, हा प्रतिसादही तितका मिळत नाही. परंतु ऑनलाइन सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या बिल भरणे शक्‍य झाल्याने अनेकजण या सुविधेचा वापर करत आहेत. शिवाय "महावितरण'ने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल ऍप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाइन बिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढली आहे. 

दोन लाख ग्राहक ऑनलाइन 
"महावितरण'ची ऑनलाइन प्रणाली सुविधा असल्याने ऑनलाइन ग्राहकांची संख्या वाढत आहे. यात फेब्रुवारीत जळगाव परिमंडळातून म्हणजे खानदेशातून एक लाख 98 हजार 632 वीज ग्राहकांकडून साधारण 25 कोटी 75 लाख रुपयांचे ऑनलाइन वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एक लाख 41 हजार 306 (17 कोटी 85 लाख), धुळे मंडळातील 43 हजार 712 (5 कोटी 81 लाख) व नंदुरबार मंडळातील 13 हजार 614 (2 कोटी 9 लाख) वीजग्राहकांचा समावेश आहे. 

"गो-ग्रीन'मध्ये अडीच हजार ग्राहकांनी नोंदणी 
ऑनलाइन सुविधेमधीलच एक भाग म्हणजे "गो-ग्रीन' ही वीजबिलाच्या छापील प्रतीऐवजी ई-मेलवर वीजबिल मिळविण्यासाठीची "महावितरण'ची पर्यावरणपूरक सुविधा आहे. या सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकास दरमहा बिलात दहा रुपयांची सूट देण्यात येत आहे. या सुविधेचा जळगाव परिमंडळात दोन हजार 569 ग्राहक लाभ घेत आहेत. या सर्व ग्राहकांना बिलात दहा रुपयांची सूट दिली जात आहे. या सेवेचा लाभ घेण्याकरिता https://consumerinfo.mahadiscom.in/ या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT