Girish Mahajan
Girish Mahajan 
उत्तर महाराष्ट्र

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही : गिरीश महाजन 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर भाजप पक्षाच्या सर्वच नेत्यांविरुद्ध बोलत असतात. त्यांच्या जिभेला हाड नाही. त्यामुळे आम्हीच नव्हे, तर जनताही आता त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजप आणि भाजप नेत्यांवर टीका करून त्यांचा खरपूस समाचार घेतला. याबाबत जिल्ह्यातील मंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही आता लक्ष देत नाही, त्यांच्या जिभेला हाड नाही. ते दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि भाजपच्या अन्य नेत्यांविरुद्ध बोलत असतात. मात्र, आता आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही.

जनताही आता त्यांच्या या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते बोलत राहिल्यास आम्हाला कोणताही फरक पडत नाही. आता ते आमच्या आणि जनतेच्या दृष्टीनेही अदखलपात्र झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT