dancing car 
उत्तर महाराष्ट्र

जळगावात "पीके'ची डान्सिंग कार...काच बंद करून चाळे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एम. जे. कॉलेजच्या समोरील गल्ल्यांमध्ये नेहमीच प्रेमीयुगलांचे चाळे रहिवाशांच्या त्रासाचा विषय झाला आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या या प्रकारामुळे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले असून, वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. अशाच प्रेमीयुगलास हटकल्यावरून एका प्राध्यापकाचे हात तोडण्यात आल्याचा प्रकार अग्रवाल हॉस्पिटलच्या मागील गल्लीत घडला होता. आज याच गल्लीत "डान्सिंग कार' चाळे करणाऱ्या प्रेमी युगलास निर्भया पथकाने ताब्यात घेत रामानंद पोलिसांच्या स्वाधीन केले. 

अमीर खानचा "पी.के' हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात कपडे मिळवण्याचे एकमेव ठिकाण असलेल्या "डान्सिंग-कार'चा सीन वेगळी ओळख निर्माण करून गेला. जळगाव शहरात रोडरोमियो, मुलींची छेडखानी करणाऱ्या चिडीमारांसाठी निर्भयापथक कार्यरत आहे. आज दुपारच्या सुमारास नियंत्रणकक्षात एम. जे. कॉलेज परिसरातील रहिवाशांनी फोन करून अश्‍लील चाळे करणाऱ्या स्कॉर्पिओ कारची माहिती दिली. नियंत्रणकक्षाकडून निर्भया पथकाला घटनास्थळावर रवाना करण्यात आल्यावर अग्रवाल हॉस्पिटलच्या मागील गल्लीत जैन मंदिराच्या रोडवर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार उभी होती. काळ्या काचा बंद केलेल्या या वाहनास निर्भया पथकातील मंजुळा तिवारी, सहाय्यक फौजदार भिकन सोनार, अभिमन इंगळे, स्वाती पाटील अशांनी कारच्या काचा उघडण्यास सांगूनही बराचवेळ आतून प्रतिसाद मिळत नव्हता. काच फोडून टाकू असे सांगितल्यावर तरुणाने कपडे व्यवस्थित करतच काच खाली केली. थोड्यावेळात खाली उतरून या तरुणाने पथकाशी हुज्जत घालतील. त्यामुळे पोलिसांनी दोघांना कारसह रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 

वाळू वाल्याचा रुबाब... 
निर्भया पथकाने चौकशी केल्यावर कारमध्ये असलेला तरुण हा बांभोरी येथील वाळू व्यावसायिक असल्याचे समजले. त्याच्या सोबत एक अल्पवयीन विद्यार्थिनी होती. पोलिस ठाण्यात आणल्यावर दोघांना कायदेशीर समज देण्यात आली. दरम्यान, कारचालक तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालून आपला रुबाब पोलिसांवर काढला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT