उत्तर महाराष्ट्र

मूकमोर्चाद्वारे पुलवामातील भ्याड हल्ल्याचा निषेध 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्य दलावर हल्ले होत आहेत. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा स्वराज्य निर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्यांसाठी कठोर कायदा अमलात आणण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 
पुलवामा येथे अतिरेक्‍यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली. यामध्ये स्वराज्य निर्माण सेनेचे कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते. त्यानंतर घटनेचा तीव्र निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

ओम शांतिनगर दुर्गोत्सव मित्रमंडळ 
शहरातील ओमशांती नगर दुर्गोत्सव मित्रमंडळातर्फे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा घेण्यात आली. सुरवातीला माजी सैनिक आनंदराव सोनवणे यांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपस्थितांनी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी योगेश सोनवणे, राहुल पाटील, अनिल जैन, मोतीलाल पाटील, विकास पाटील, गिरीश फेगडे, रूपेश पाटील, तुषार राजपूत, भावेश पाटील आदी उपस्थित होते. 

सुरय्या हबीब पटेल महिला मंडळ 
दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना सुरय्या हबीब पटेल महिला मंडळातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, राजू मराठे, अमजद गबलू खान, अकिल पहेलवान, अंजली बाविस्कर यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

विद्या इंग्लिश मीडियम स्कूल 
हल्ल्याच्या निषेधार्थ विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रद्धांजली सभा झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्याध्यापक हॅरी जॉन, कामिनी भट, संजय चव्हाण, मयुरी शर्मा, सचिन पाटील, कृष्णा सपकाळे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT