live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात "एसटी'च्या बंदला संमिश्र प्रतिसाद 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यभरात पुकारलेल्या या बंदला महामंडळाच्या जळगाव विभागातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत 845 फेऱ्यांपैकी 394 फेऱ्या सुटल्या असून, 511 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 4849 कोटी रूपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. परंतू, मान्यताप्राप्त कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) या संघटनांतर्फे संप पुकारण्यात आला आहे. मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात केली. या संपात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक मिळून विभागातून तीन ते साडेतीन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रवाशांना संपाबाबत कल्पना नसल्याने बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसफेऱ्या बंद झाल्याने ताटकळत बसावे लागले होते. 

तीन आगारात पुर्ण बंद 
जळगाव विभागातंर्गत येणाऱ्या रावेर, जामनेर आणि चोपडा या आगारांमधून सकाळपासून एक देखील फेरी सोडण्यात आली नाही. मात्र, सकाळी नऊ वाजेनंतर अमळनेर, पाचोरा, भुसावळ, चाळीसगाव, मुक्‍ताईनगर या आगारांमधील फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. जळगाव आगारातील फेऱ्यांवर बंदचा परिणाम झाला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT