उत्तर महाराष्ट्र

वयस्कर बापाला हात जोडावयास लावणारा वंशाचा दिवा काय कामाचा? : सुप्रिया सुळें 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पंच्च्याहत्तर वर्षे वयाच्या बापाला आपल्या राजकारणाच्या यशासाठी दुसऱ्याच्या दारात हात जोडावयास लावत असेल तर तो वंशाचा दिवा काय कामाचा? त्यापेक्षा आम्ही लेकी बऱ्या, आम्ही आमच्या बापावर ती वेळ येऊ देणार नाही, असा टोला पक्षबदल करणाऱ्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

संवाद यात्रेनिमित्त त्या गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात आहेत. जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, काहीजण आज पुत्र प्रेमापोटी पक्षबदल करीत आहेत. मात्र, हे दुर्दैवी आहे. राजकारणात यश मिळविण्यासाठी पुत्र आज पंच्च्याहत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्याच्या दारात हात जोडण्यासाठी पाठवीत असतील तो वंशाचा काय कामाचा? त्यापेक्षा आम्ही लेकी बऱ्या, आम्ही आमच्या वयस्कर बापाला या वयात कधीच कोणापुढे हात जोडावयासाठी पाठविणार नाही. 

सत्तर वर्षांतील सर्वांत मोठी मंदी 
हल्लीच्या मंदीच्या स्थितीवर बोलताना त्या म्हणाल्या, सत्तर वर्षांत काय केले, असे भाजप विचारते. आज देशात जी मंदीची परिस्थिती आली आहे, अशी मंदी गेल्या सत्तर वर्षांत कधीही नव्हती. ही मंदीची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT