उत्तर महाराष्ट्र

तलाठी परीक्षेच्या निकालाबाबत गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः शासनाच्या महसूल प्रशासनाकडून तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे. परीक्षेच्या निवड यादीमध्ये गुणवत्तेनुसार नावे न आल्याने 50 ते 60 उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. निकालाच्या यादीत घोळ झाल्याचे सांगून नवीन यादी लावण्यात यावी, अशी मागणी केली. 
तलाठी परीक्षेच्या निकालाच्या यादीमध्ये अधिक जास्तीचे गुण मिळालेल्या उमेदवारांना डावलून कमी गुण असलेल्या उमेदवारांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची गुण जास्त असताना नावे आलेली नाही. अशा उमेदवारांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमा होऊन जाब विचारला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे उमेदवारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांची बाजू समजून घेत नवीन यादी लावण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी गुणवत्तेच्या आधारे मेरिट लिस्ट जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली. 

"कटऑफ लिस्ट' जाहीर झालीच नाही 
तलाठी परीक्षेची यादी जाहीर करताना "कटऑफ लिस्ट' जाहीर करणे आवश्‍यक होते; परंतु प्रशासनाकडून ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही, असा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. परीक्षेला 22 हजार परीक्षार्थी बसले होते. सर्वांची यादी जाहीर करावी, 99 जागांसाठी परीक्षा झाली असून, त्यापैकी 190 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी कोणत्या आधारे लावण्यात आली याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. यावेळी शुभम जोशी, रितेश सोनवणे, शर्मिला गोल्हाहीत, संदीप बोरसे, संग्राम पाटील यांच्यासह चाळीस ते साठ उमेदवारांची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT