live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव गारठले; पारा 8 अंशांवर! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तीन-चार दिवसांपासून 10 अंशांवर स्थिर असलेले तापमान आज घसरले. किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. 
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडीच्या वाऱ्यांचा प्रवेश झाला असल्याने कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पारा घसरत आहे. यात चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील तापमान 10 अंशांवर स्थिरावले होते. यामुळे निर्माण झालेल्या हुडहुडीने जळगावकर गारठले आहेत. सकाळपासून सुरू असलेले गार वारे दिवसभर अंगाला झोंबत आहेत. यामुळे दिवसभर उबदार कपडे घालून ठेवले जात आहेत. उत्तर भारतातील थंड वाऱ्याचा प्रभाव अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

नीचांकी तापमान 
उन्हाळ्यात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होणाऱ्या जळगावात हिवाळ्यातील यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात 12-13 अंश सेल्सिअसवर असलेले तापमान चार दिवसांपासून 10 अंशावर स्थिर होते. परंतु, यात 2 अंशांची घसरण होऊन आजचे किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. 

उबदार कपड्यांची विक्री वाढली 
थंडीचा जोर वाढू लागल्याने उबदार कपड्यांची मागणीही वाढली आहे. शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ असलेल्या विक्रेत्यांकडे दिवसभर गर्दी पाहावयास मिळत आहे. कानटोपी, स्वेटर, जॅकेट, हातमोजे यासारख्या उबदार कपड्यांची मागणी अधिक वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT