live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा, आचारसंहितेचा भंग होत असल्यास तत्काळ कारवाई करा, नेमून दिलेले कार्य जबाबदारीने करा, निष्काळजीपणा केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे झोनल अधिकाऱ्यांना दिला. 
जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या 343 झोनल अधिकाऱ्यांना आज सकाळी दहापासून जिल्हा नियोजन समितीत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार बाळासाहेब गाढवे, तहसीलदार सुभाष दळवी आदी उपस्थित होते. 
यावेळी झोनल अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेदरम्यान जबाबदारी, करावयाची कामे, भूमिका, मतदानाच्या दिवशी करावयाची कामे, मतमोजणी वेळी घ्यावयाची दक्षता, करावयाची कामे आदींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी झोनल अधिकाऱ्यांनी विविध प्रश्‍न विचारून शंकांचे समाधान करून घेतले. 

विभागप्रमुखांची आज बैठक 
विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. यासाठी तसेच या कालावधीत विभागप्रमुख व राजकीय पक्षांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक सकाळी साडेदहाला होणार आहे. 

राजकीय प्रतिनिधींची आज बैठक 
विधानसभेत राजकीय पक्षांनी आचारसंहिता भंग न होण्यासाठी काय केले पाहिजे, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक दुपारी बाराला नियोजन भवनात होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT