railway line
railway line 
उत्तर महाराष्ट्र

तिसऱ्या लाईनसह प्रलंबित कामे दोन वर्षात पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनसह वाढीव रॅक्‍स, बोगी, वाढविण्याचे काम सुरू असून प्लॅटफॉर्मची देखील लांबी वाढविण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात काम पूर्ण होऊन प्रवाशांना संपूर्ण सुविधा उपलब्ध होणार असल्याचे (पीआरसी) प्रवासी सेवा समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले. 

येथील रेल्वे स्थानकाची पाहणीसाठी प्रवासी सेवा समितीचे सदस्य डॉ. फडके, चेअरमन पी. के. कृष्णदास, प्रेमेंदर रेड्डी, काकू विजया लक्ष्मी, सी रवींद्र, परशुराम माथो, हेमांद्रीबल, एडीआरएम मनोज सिन्हा, सीडीजीई राजेश चिखले, डीजीई लखीरा, डीसीएम अरुण कुमार, एसीएम अनिल बागले या अधिकाऱ्यांसह आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. 


दरम्यान प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरील होणाऱ्या असुविधांविषयी समिती पुढे तक्रारी मांडल्या. यावेळी समितीने रेल्वे स्थानकावर जाऊन विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, फलाट, प्रतीक्षा गृहांची पाहणी, सीसीटीव्ही रूमची पाहणी केली. तसेच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समितीतर्फे रेल्वेच्या संपूर्ण झोनची पाहणी करण्याचे काम सुरू असून सुरवातीला मुंबई वेर्स्टर्न, हार्बर, सेंट्रल रेल्वे नंतर भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. जळगाव रेल्वे स्थानकावरील वाढीव रेल्वे लाईनचे कामासह प्लॅटफॉर्म, बोगीवाढसह अन्य कामांत सुधारणा केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवाशांसाठीची रेल्वे अंतर्गत सुखकर प्रवासासाठी पीसीए कमिटीची नियुक्ती केली असून या अंतर्गत प्रवाशांच्या समस्या जाणून घेत त्यांना होणाऱ्या असुविधांचा तत्काळ निपटारा करण्यात येत आहे. रेल्वेतील समस्यांसंदर्भात अनेक समस्या प्राप्त झाल्या असून त्या सोडविण्यात येणार आहे. 

रिक्षा चालकांचे अतिक्रमण 
समितीसमोर अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकासमोर रिक्षा अधिक संख्येने थांबतात. यामुळे आमची रेल्वे सुटते, रेल्वेचे तिकीट मिळत नाही. दलालांची संख्या वाढली आदी समस्या मांडल्या. त्यावर समितीने जळगाव महापालिका, शहर वाहतूक शाखेला रिक्षा पोलिस चौकीच्या बाहेर नेण्याबाबत पत्र देण्यास सांगितले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT