residenational photo
residenational photo 
उत्तर महाराष्ट्र

सुराणा ज्वेलर्स, द दमाज सराफी पेढ्यांवर छापे 

सकाळवृत्तसेवा

नाशिक: शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स व महात्मानगर येथील द दमाज या सराफी पेढ्यांवर बुधवारी (ता. 21) दुपारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. सुराणा ज्वेलर्सने "गीतांजली' या ब्रॅन्डची फ्रेंचाइसी घेतलेली होती, तर द दमाज येथून हिऱ्यांची विक्री केली जाते. नुकताच उघडकीस आलेल्या पीएनबी घोटाळ्यातील संशयित नीरव मोदी याच्या ब्रॅन्डशी संबंधित सराफी व हिऱ्यांच्या व्यावसायिकांची प्राप्तिकर विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्याअंतर्गत हे छापे पडल्याची चर्चा आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स या सराफी पेढीवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्याचवेळी महात्मानगर येथील द दमाज या पेढीवरही छापा टाकला. त्यानंतर शहरातील आणखी काही ज्वेलर्सच्या पेढ्यांवर छापा पडल्याची चर्चा होती. रात्री उशिरापर्यंत सुराणा व द दमाज या ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडून चौकशी सुरू होती. ज्वेलरी दुकानांची शटर्स अर्धवट बंद करण्यात आलेले होते. शिवाय दुकानांबाहेर सुरक्षारक्षक तैनात होते. अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला; पण कर्मचाऱ्यांकडून काहीही माहिती मिळाली नाही. मोदीच्या ब्रॅन्डशी या दोन पेढ्यांचा संबंध आहे का, याची खात्री करण्याचे काम सध्या सुरू आहे. नीरव मोदीच्या घोटाळ्याचे तार नाशिकच्या सराफी व्यावसायिकांपर्यंत पोचल्याचे मात्र बोलले जाते आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT