Cotton 
उत्तर महाराष्ट्र

पांढरे सोने शेतकऱ्यांची करतेय दमछाक

मात्र संततधारेमुळे मोठे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यात कापूस या नगदी पिकामुळे शेतकऱ्यांच्या हाती थोडाफार पैसा खेळता राहतो.

जगन्नाथ पाटील


कापडणे : धुळे जिल्ह्यात महिनाभरापासून पाऊस सुरू आहे. उशिराचा पाऊस (Rain)आणि दुबार पेरणी (Showing) करून तग धरून तरारलेल्या व काढणीस आलेल्या पिकांचे (Crop Damage) यामुळे मोठे नुकसान होत आहे. चालू खरीप हंगामाचा काढणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत संततधारेने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. बागायती कापसासह कोरडवाहू कापसाचे (Cotton) नुकसान होत आहे. पांढरे सोने काळे पडू लागले आहे. बुडालेला हंगाम आवरण्यासाठी शेतकऱ्यांची (Farmers) दमछाक होत आहे.


पाच आठवड्यांपासून संततधार सुरू आहे. बाजरी, मका, ज्वारी, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे नुकसान होत आहे. उशिराच्या पेरण्या त्यानंतरही दुबार पेरण्या झाल्या. त्यातच पावसाने दडी मारली होती. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. थोडाफार हंगाम हाती लागेल, अशी शेतकऱ्यांना शाश्वती होती.

मात्र संततधारेमुळे मोठे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यात कापूस या नगदी पिकामुळे शेतकऱ्यांच्या हाती थोडाफार पैसा खेळता राहतो. या वर्षी कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अतिवृष्टीने बोंडे काळवंडली आहेत. ओला कापूस काढणीचा खर्च वाढला आहे. शेतकरी अधिक भाव मिळेल, या आशेने कापूस वाळवत आहेत. काढणी व वाळवणे आदींमुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT