उत्तर महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर आली अवकळा ! 

जगन्नाथ पाटील

कापडणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील वर्षी, दभाषी, दत्ताणे, गव्हाणे, कमखेडे, खलाणे, सुकवद, हुंबर्डे, टेंबलाय, निरगुडी, अंजदे, कलमाडी परिसरात दादर, मका, भाजीपाला व कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. पिके आडवी पडली आहेत. लोकप्रतिनिधींनी थेट शेतशिवारात जाऊन पाहणी केली. नुकसानीचा अंदाज घेतला व शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. 

आवश्य वाचा- अंगावर बर्फ पडल्‍याने जवानाचा मृत्‍यू; महिनाभरात चाळीसगाव तालुक्‍याने दुसरा जवान गमावला

आमदार जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य देवीदास बोरसे, भाजपचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकरी वासुदेव बेहरे, पंडित मोरे, रोहित वाडिले व नुकसानग्रस्त शेतकरी या वेळी उपस्थित होते. 

भाजीपाला भुईसपाट 
दोन दिवसांपासून शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. आणखी दोन-तीन दिवस हे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांची अवकळा झाली आहे. भाजीपालाही भुईसपाट झाला आहे. रब्बीसाठी शेती तयार करण्यास व पेरणीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. 

वाचा- राज्यपाल म्हणतात शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल 

शेतीकामे ठप्प 
शिंदखेडा तालुक्यातील तापी पट्ट्यात कोरडवाहू दादरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दादरीचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामे करावेत. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: ५५ हजार ९६९ कोटींचे सामंजस्य करार, अर्थव्यवस्थेला बळ मिळणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Ranji Trophy: महाराष्ट्राचा मोठा विजय! पृथ्वी शॉच्या द्विशतकानंतर मुकेश चौधरी अन् रामकृष्ण घोषचा चंदिगढविरुद्ध तिखट मारा

Renault Duster: डस्टर येतेय! दमदार फिचर.. आयकॉनिक 'एसयूव्ही'ची प्रतीक्षा संपली; तारीखही झाली फायनल

Mumbai News: पुनर्विकासातून ६ लाख नवीन घरे! म्हाडा उपाध्यक्षांची माहिती; जपानच्या शिष्टमंडळाची मुख्यालयास भेट

Latest Marathi News Live Update : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT