tomato
tomato 
उत्तर महाराष्ट्र

शेतात या अन्‌ टोमॅटो फुकट न्या 

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : "कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजीपाल्याच्या वाहतुकीतही अनेक अडचणी येत आहेत. यातून भाजीपाल्याची मागणीही घटली असून, सर्वच भाजीपाल्याचे दरही अवघे दहा ते वीस रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. व्यापारी टोमॅटोची 20 रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदीसही नकार देत आहेत. किरकोळ विक्रेते दोन ते पाच रुपये प्रतिकिलोने विक्री करत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वांगी, टोमॅटो जनावरांपुढे वैरण म्हणून टाकण्यास प्रारंभ केला आहे. येथील शेतकरी तथा माजी सरपंच जीवन माळी यांनी तर "शेतात या अन्‌ टोमॅटो न्या', असे आवाहनच केले आहे. 
मार्च, एप्रिल व मेमध्ये लग्नसराईची धूम असते. मात्र, "कोरोना'मुळे लग्नसराई ठप्प झाली आहे. या काळात नेहमी टोमॅटो आणि वांगी यांना असणारी मागणी घटली आहे. दुसरीकडे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, ग्राहक नसल्याने ती दुभत्या जनावरांपुढे वैरण म्हणून टाकली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या शेतातही शेळ्या- मेंढ्या सोडून दिल्या आहेत. 

टोमॅटो वाटले मोफत 
येथील माजी सरपंच जीवन माळी यांनी दीड एकर क्षेत्रात टोमॅटो व वांग्यांची लागवड केली आहे. मात्र, काढणी ठप्प झाल्याने त्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. कोरोनामुळे खरेदीदार व्यापारी शेताकडे फिरकेनासे झाले आहेत. यामुळे माळी यांनी टोमॅटोचे मोफत वितरण सुरू केले आहे. व्यापाऱ्यांनाही थेट शेतातून टोमॅटो नेण्याचे आवाहन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT