Nandgao
Nandgao 
उत्तर महाराष्ट्र

नांदगाव आगाराच्या तीन बस बंद पडल्याने प्रवाशांची कुचंबणा 

संजीव निकम

नांदगाव : एकाच दिवसात हमखास वाहतुकीच्या वर्दळ असलेल्या मार्गावर तीन बसेस नादुरुस्त होऊन बंद पडल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी कुचंबणा झाल्याचा प्रकार सोमवारी घडला यामुळे अगोदरच कोलमडलेले वेळापत्रक व त्यातच वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसेस अशी ख्याती असलेल्या नांदगाव आगारातील कार्यक्षमतेच्या मुद्दयांवर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कधीकाळी सर्वाधिक इंधन बचतीचा लौकिक मिळविणाऱ्या नांदगाव आगारातील अलीकडच्या काळातली झालेली दुरावस्था कधी थांबणार असा प्रश्न प्रवाशी विचारत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेले वाहतुकीच्या नियमांना बगल देत येथील आगारात पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ वापरून झालेल्या खडखडाटी बसेसचा ताफा दिमतीला देण्यात आला आहे. एकाच दिवसात नांदगाव नाशिक दरम्यानच्या प्रवासासाठी एकूण तीन बसेस नादुरुस्त होऊन बंद पडण्याची हॅट्रिक मात्र आगाराने मिळविली. 

गुरुकृपा नगरात राहणारे संजय शर्मा  सोमवारी सकाळी कामानिमित्त सकाळी ७ च्या नांदगाव नाशिक (बस क्र. एमएच १४ बीटी ०७७८) बसने नाशिकला जाण्यासाठी निघाले. सुरवातीपासून आवाज करणारी ही बस जेमतेम चांदवड (४८ किमी) येथे पोहोचली. त्याठिकाणी बस नादुरुस्त झाल्याने पुढे जाणार नाही असे चालकाने जाहीर केले. इतर आगाराच्या बस वाहकांच्या विनवण्या करून तासभर ताटकळलेले प्रवासी मजल दरमजल करत पुढील प्रवासाला निघाले. 

नांदगाव आगाराची दुसरी एमएच १४ बीटी ०४८७ बस दुपारी चार वाजता नांदगावहून नाशिकला निघाली. ती ६५ किमीचा प्रवास करून वडाळी येथे राष्ट्रीय महामार्गावर बंद पडली. उन्हाचे चटके खात रस्त्यावर उतरून पुनः एकदा दुसऱ्या आगाराच्या बसेसना हात देत प्रवासी नांदगाव आगाराची कर्मकहाणी सांगत इतर बसमध्ये तिकिटे दाखवून उसन्या प्रवासाला निघाले.

या दरम्यान दुपारी तीन वाजता नांदगाव आगाराची नाशिकहून नांदगावकडे येणारी बस क्र. एमएच ०७ सीएच ९३३९ ही बस पिंपळगाव नाका ते चांदवड या रस्त्यावर पाचोरा फाटा येथे फेल झाली. सकाळी ७ वा. च्या बसचा अनुभव गाठीशी असलेले शर्मा याच बसमधून नांदगावला जड सामान घेऊन निघाले होते. चार वाजता बंद पडलेल्या बससाठी पिंपळगाव आगाराचे यांत्रिकी पथक अडीच तासानंतर आले. त्यांनी बस दुरुस्तीला असमर्थता दर्शवून तिला ‘टो” करून आगारात नेले. बुडणाऱ्या जहाजात जसे कोणीही थांबत नाही. तसे यावेळी ही प्रवासी सवयीने जमेल तसे मिळेल त्या बसने उभे राहून धक्का बुक्की खात उशिराने नांदगावला गेले.

शर्मा भाड्याची गाडी करून रात्री १२ वा. नांदगावला पोहोचले.एकेकाळी इंधन बचतीचे पारितोषिक मिळविणारे लांब पल्यांच्या वक्तशीर गाड्यासाठी प्रसिध्द असलेल्या  नांदगाव आगाराची दयनीय अवस्था कशी झाली. हा संशोधनाचा विषय असला तरी अलीकडे बससाठी विद्यार्थ्यांनी केलेला रस्ता रोको असो की, वेळेवर न धावणाऱ्या बसेसमुळे खासगी वाहनांचा तेजीत आलेला धंदा असो. एकूणच  नांदगाव आगार विवादाचा विषय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT