heavy rain sakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात आज वादळासह पावसाची शक्यता

नंदुरबार जिल्ह्यात आज वादळासह पावसाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : जिल्ह्यात आज ३० ते ४० किलोमीटर वेगाचा वादळी वारा, वीज, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविली आहे. (nandurbar-district-today-heavy-rain-and-strom)

वादळी वारा व मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी (Disaster Management Authority Nandurbar) केले आहे. तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा. नागरिकांनी खबरदारी घेऊन कुठल्याही प्रकारची आपत्ती घडणार नाही; याबाबत दक्षता घ्यावी. अशा सुचना देखील दिल्‍या आहेत.

नागरीकांनी बाहेर जाणे टाळा

विजांच्या कडकडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. घराची बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT