उत्तर महाराष्ट्र

ग्रामपंचायतीला पडला विसर; गृहरक्षक जवानाने कर्तव्य पारपाडत पाॅझेटिव्ह दांम्पत्याचे घर, परिसर केला निर्जंतुकीकरण

जसपाल वळवी

वाण्याविहिर : अक्कलकुवा शहरांमधील भिम नगर परिसरातील एका कुटुंबातील दाम्पत्य गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्यांचे घर तसेच परिसर संबंधित विभागाने निर्जंतुकीकरण न केल्यामुळे तसेच कोणतीही खबरदारीची उपाययोजना करण्यासही अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना पॉझिटिव दाम्पत्याचे घर तसेच परिसर गृहरक्षक दलाचे जवान सुनील झाल्टे यांनी स्वतः स्वखर्चाने घर व घराच्या परिसरात निर्जंतुकीकरण करून गृहरक्षक दलाचा मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला.

अक्कलकुवा शहरातील भीम नगर परिसरातील एक दांपत्य गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते या दाम्पत्याच्या परिवारात वयोवृद्ध तसेच बालकांचा समावेश असल्यामुळे भिती पससली होती कोरोना पॉझिटिव असलेल्या दाम्पत्याला सौम्य लक्षणे असल्यामुळे आवश्यक तो औषध उपचार करून आपल्या राहत्या घरातच विलगीकरण करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. घराचे तसेच परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यास संबंधित विभागाने कुठलीही तसदी घेतली नाही.

कर्तव्याची जाण 

खबरदारीची उपाययोजना देखील करण्यात आली नसल्यामुळे या परिवाराच्या शेजारी राहणारे गृहरक्षक दलाचे जवान सुनील झाल्टे यांनी आपल्या मानवी कर्तव्याची जाण ठेवून आपला जीव धोक्यात घालून अक्कलकुवा पोलीस ठाण्यातून निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्प्रे मशीन आणून स्वखर्चाने कोरोना पॉझिटिव असलेले दाम्पत्याचे घर तसेच परिसरात फवारणी केली. 


प्रशासनाला पडला विसर

कोरोना महामारी च्या सुरुवातीला एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे घरासह घराच्या आजूबाजूच्या परिसर संपूर्णपणे निर्जंतुकीकरण केला जात होता. मात्र ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरणयाच्या नावावर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे पाण्यावर उघडकीस आले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP : सुनेत्रा पवारांची खेळी यशस्वी, पुणे झेडपीत विषय समित्यांचे सभापती जाहीर; सव्वा वर्षांचा कार्यकाळ, हर्षवर्धन पाटलांच्या कन्येला संधी

US Education Trends : भारतीय विद्यार्थ्यांना नकोय अमेरिकेत शिक्षण ! प्रवेशांच्या संख्येत घट; धक्कादायक कारण आले समोर, सरकारचा संसदेत खुलासा

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस माफियांवर मोठी कारवाई, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

SCROLL FOR NEXT