internet mobile use depression
internet mobile use depression 
उत्तर महाराष्ट्र

इंटरनेट, मोबाईल करताय डोके खाली; यामुळेच तब्‍बल ६८ व्‍यक्‍तींची आत्‍महत्‍या

धनराज माळी

नंदुरबार : वर्षाकाठी जगात साधारण आठ लाख व्यक्तींच्या आत्महत्या होतात, त्याला कारणे वेगवेगळी आहेत. विशेषतः पंधरा ते २९ वर्षीय तरुणांचा त्यात सवार्धिक समावेश असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात एप्रिल ते आजपर्यंत गेल्या पाच महिन्यात ६८ व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे उपचारानंतर समुपदेशन केल्यावर वेगवेगळी कारणे पुढे आले आहेत, ती भयानक अन चिंता वाढविणारी आहेत. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर, बेरोजगारी ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. 

लॉकडाऊन काळात घरातच राहा, सुरक्षित राहा हेच तरुणांसाठी नैराश्येचे प्रमुख कारण ठरले असल्याचे तज्ञांचे मत आहे. जिल्हा रुग्णालयातील चिकित्सक मानसशास्त्रज्ञ प्रवीण डोंगरे यांनीही ते मान्य केले आहे. लॉकडाऊन काळात वेळ घालविण्यासाठी तासनतास मोबाईल, व्हीडिओ (पब्जी ) गेम, इंटरनेट, सायकोसिस आजार, काही गंभीर आजार, व्यसन जडणे, दारू, गांजाचे व्यसन व ते न मिळणे या कारणांमुळे नैराश्य येऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. अशा जिल्ह्यातील ६८ व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचार करून त्यांची कुटुंबाकडून तसेच स्वतः आत्महत्या करणाऱ्यांस समुपदेशन करताना पुढे आलेली माहिती आहे. त्यात विशेषतः १५ ते २९ वषीर्य तरुणांचा अधिक समावेश असल्याचे श्री. डोंगरे यांनी अहवालात म्हटले आहे. 

आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाय 
- व्यसनापासून दूर राहणे 
- सकारात्मक विचार करणे 
- विविध छंद जोपासणे 
- योग्यवेळी नाही म्हणणे शिकावे 
- जवळच्या माणसाकडे मन मोकळे करणे 
- मानसिक आरोग्याबाबत तज्ञांचा सल्ला घेणे 
 
पालकांसाठी खबरदारीचे उपाय 
- घरामध्ये आत्महत्येविषयी बोलू नये, बोलल्यास दुर्लक्ष करू नका 
- आत्महत्येचे प्रयत्न केलेल्या व्यक्ती परत आत्महत्या करण्याची शक्यता असते. त्यांना भावनिक आधार द्या. 
- चाकू, सुरी, फवारणीचे औषध तसेच इतर धोकेदायक वस्तू सहज सापडतील अशा ठेवू नका. 
- आत्महत्येचे विचार येणाऱ्या व्यक्तीला एकटे सोडू नये, त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे. 
- आत्महत्या करण्यापूर्वी अनेकजण काहीतरी संकेत देतात, ते समजताच तातडीने तज्ज्ञांची मदत घ्या. 
 
येथे मिळेल मदत 
-मानसिक आरोग्य विनामूल्य मदत वाहिनी नं १०४ 
-सर्व शासकिय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये 
-जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम 
-मानसोपचार विभाग,जिल्हा रुग्णालय 
 
नैराश्यातून माणूस बेचैन होऊन तो भान विसरतो. आपण काय करतो आहे हे कळतच नाही. केवळ जीवन संपविणे हेच त्याचे ध्येय त्या वेळेपुरते बनते. त्यामुळे ते नकळत ते करतो, त्यातून आत्महत्या केली जाते. हे मानसिक संतुलन बिघडण्याचा प्रकार आहे. ते ते बिघडू नये यासाठी पालकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. तशा घटना, वाचन, तसे लिखाण किंवा तसे दृश्यापासून लांब ठेवणे व मोबाईल गेम, इंटरनेटच्या वापरावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे. 
- प्रवीण डोंगरे, चिकित्सक मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय ,नंदुरबार 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT