Band 
उत्तर महाराष्ट्र

वाजवा रे वाजवा..बॅन्ड-डीजे पथकांना नोव्हेंबरपासून शासनाची परवानगी

निलेश पाटील


शनिमांडळ : कोरोनामुळे (Corona) जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून बॅन्ड-बॅन्जो(Band), तसेच डीजे (DJ) व्यावसायिकांवर (Business) उपासमारीची वेळ आली होती. यामुळे राज्य शासनाने (state government) याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन बॅन्ड व्यवसायिकांना लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमांत वाद्य वाजविण्यास मुभा दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचे नंदुरबार जिल्हा बॅन्ड व डीजे व्यावसायिकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.


याबाबत नंदुरबार जिल्हा बॅन्ड असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष प्रमेश वसावे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेली १७ ते १८ महिने कोरोना महामारीमुळे समाजातील शुभ कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम त्यावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांवर शासनस्तरावरून बंधन आलेले होते. समाजातील कोणतेही शुभ कार्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम बॅन्ड, बॅन्जोच्या सादरीकरणाशिवाय पूर्णत्वाला येत नाही, असा सामाजिक संकेत असताना व त्यावर हजारो कलाकार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. अशा कलाकारांची गेली अठरा महिने वाईट स्थितीत गेली. त्यामध्ये त्यांना कौटुंबिक अस्थिरतेला सामोरे जावे लागले. उत्पन्नाचे कसलेही साधन नसताना त्यांना कुटुंब कसे जगवावे, अशा परिस्थितीमधून जावे लागले. त्यासाठी जवळची पुंजी संपल्यावर काही लोकांना वाद्य विकावी लागली. त्यातून हा व्यवसाय बंद पडलेला. त्यामुळे त्यांचे जगणे अवघड झाले होते.


राज्य संघटना सातत्याने शासनस्तरावरून हा व्यवसाय सुरू होण्यासाठी पाठपुरावा करत होते. त्यातूनच सध्याच्या महाराष्ट्र शासनाने २२ ऑक्टोबरपासून संस्कृतिक कार्यक्रमांना म्हणजेच बंदिस्त व मोकळ्या जागेवरील कार्यक्रमाला परवानगी दिल्यामुळे बॅन्ड, बॅन्जो आणि डीजे कलाकारांना नोव्हेंबरपासून बॅन्ड, बॅन्जो वाजवण्यास परवानगी मिळालेली आहे. त्या पद्धतीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी व सांस्कृतिक मंत्रालय, मुंबई यांनी तसे परिपत्रक जारी केलेले आहे. आता इथून पुढे प्रत्येक बॅन्ड, बॅन्जो कलाकारांना शुभ कार्यामध्ये वाद्य वाजविणे सुलभ झाले आहे. त्यांनीसुद्धा ते सर्व करताना कोरोनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.


बॅन्ड, बॅन्जोचालक कलाकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोकराव जाधव यांनी शासन निर्णयाचे स्वागत करून आभार मानले. कलाकार लोकांनी बॅन्ड सादरीकरण करताना कोरोनाच्या नियमाचे योग्यरीत्या पालन करून आपला व्यवसाय करावा. सामाजिक स्थैर्य व शांतता याचा भंग होता कामा नये, याबाबत योग्य दक्षता सर्वांनी घ्यावी. व्यवसायिकांना यापूर्वीच्या जीआरप्रमाणे मंगल कार्यालयांवरील बंधनामुळे मंगल कार्यालयाचे मालक बॅन्ड पथकांना संख्येच्या प्रमाणात नाकारत होते. त्यासाठी संघटनेने मंगल कार्यालय असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत बैठक करून अडचणीबाबत चर्चा केली असता मंगल कार्यालय अध्यक्षांनी बॅन्ड कलाकारांची अडचण समजून घेत आताच्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे बॅन्ड, बॅन्जो पथकांना कार्यालयासमोर वाजवण्यास कसलीच अडचण येणार नाही, असे राज्य संघटनेने कळविल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, ODI: ८ षटकार अन् ८ फोर... भारताविरुद्ध गुरबाजचं शतक, डिविलियर्सचा विक्रमही मोडला; पण विदर्भाच्या पठ्ठ्याही चमकला

Aadhaar Card Rule: मोठी बातमी! १८ वर्षांवरील लोकांना आधार कार्ड मिळणार नाही; असा निर्णय नेमका कुणी घेतला अन् का? नवे नियम लागू

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट होणार

IND vs AFG, ODI: पाऊस सुरू असताना भारताचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय करत होते? BCCI नेच शेअर केलाय Video

Pune Traffic: विश्रांतवाडी चौक ते फुले नगर रस्त्यावरचा बीआरटीमार्ग काढून टाकण्याचा निर्णय; पीएमपीचा विरोध मनपाने झुगारला

SCROLL FOR NEXT