bus 
उत्तर महाराष्ट्र

‘एसटी’चे मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण! 

सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : ‘लॉकडाउन’मुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता मालवाहतूक क्षेतात पर्दापण केले आहे. याअनुषंगाने धुळे विभागातून पहिला मालवाहतुकीचा ट्रक रवाना केल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. 

‘लॉकडाउन’मुळे राज्यात मालवाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत असताना तातडीची उपाययोजना म्हणून राज्य शासनाने महामंडळात एका अधिसूचनेद्वारे मालवाहतुकीचे अधिकार प्रदान केले आहेत. यापूर्वी महामंडळाकडे प्रवासी वाहतुकीचा अधिकार असल्याने त्या अनुभवाच्या अनुषंगाने मालवाहतुकीचे नियोजन करण्याबाबत महामंडळाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

सद्यःस्थितीत महामंडळाकडे २७८ ट्रक असून, त्यांनी १५३ ट्रक बंदिस्त स्वरूपाचे आहेत. महामंडळाकडे १७ हजार बस ताफ्यात असून, त्यातील जवळजवळ तीन हजार बस बंदिस्त ट्रकमध्ये परावर्तित केल्या जाणार आहेत. धुळे विभागाकडे सद्यःस्थितीत आठ बंदिस्त ट्रक आहेत. याद्वारे धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतून मालवाहतुकीचे नियोजन होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

महामंडळ मालवाहतुकीच्या क्षेत्रात प्रथमच प्रवेश करीत असल्याने दर निश्चित करीत असताना बाजारामध्ये प्रचलित असलेल्या दरानुसार मालवाहतुकीच्या दरांची निश्चिती होणार आहे. परावर्तित करण्यात येणाऱ्या ट्रकची वाहतूक क्षमता एक मेट्रिक टनइतकी करण्यात येणार आहे. मालवाहतुकीची सेवा राज्यभरात २५० आगार व ६०० बसस्थानकांमार्फत उपलब्ध राहील. 

आगारात संपर्क साधावा 
या वाहतुकीबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या आगारात संपर्क साधल्यास आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी, व्यापारी, लघु व मोठे कारखानदार यांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT