Theft  
उत्तर महाराष्ट्र

देवाऱ्यातुन देव गायब..चोरटयांनी देवच पळविले

Nandurbar Theft News : घरात असलेल्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची दागिने व रोख रक्कम नेली तर एका घरातून देवाऱ्यांतील देव ही पळविल्याची घटना घडली आहे.

रमेश पाटील

सारंगखेडा : देवाऱ्यातुन देव गायब..चोरट्यांनी देवालाही चक्क पळविले. देवघरातील पाषाणाचे देव देखील चोरटया नी चोरीस नेल्याची अनोखी चोरीची (House temple Theft ) घटना घडली. चाकूचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी परिसरामध्ये वावरत आहे. सारंगखेडा सह अनरद (ता.शहादा) या छोट्याशा गावात एकाच रात्री आठ ठिकाणी चोरी झाली. दरम्यान या चोरीच्या घटना संदर्भात स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीसांसमोर ( Police) आव्हान उभे राहिले आहे.


सारंगखेडा येथील कळंबू रस्त्यालगत असलेल्या भागात राहणाऱ्या घरात भरदिवसा घरात झोपलेल्या महिलेच्या गळयात चाकू लावला व घरातील सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर (ता.२०) मध्यरात्री अनरद (ता.शहादा) गावातील आठ ठिकाणी चोरी झाली. घरात असलेल्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची दागिने व रोख रक्कम नेली तर एका घरातून देवाऱ्यांतील देव ही पळविल्याची घटना घडली आहे. परिसरात या चोरट्यांनी अशा प्रकारची धुमाकूळ घातला आहे. मात्र अद्यापही पोळीसांना त्यांचा सुगावा लागलेला नसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

देव पळविले
अनरद (ता. शहादा) येथील कल्पना माळी यांचा घरातून चोरटयांनी दरवाजाची लोखंडी कडी कापून त्यांनी घरातील कपाट फोडून कपाटातील सोने, चांदीचे दागिने चोरून देवघरातील विठ्ठल ,भोलेनाथची पाषाणाचे देव देखील चोरून नेले आहेत. श्रीमंती माळी गावाला गेलेल्या होत्या सकाळी घरी आल्यावर घरात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले. त्या वेळे देवाऱ्यात ही देव दिसून आले नाहीत .

पोलीसांपुढे आव्हान..
कोरोनाकाळात गुन्हेगारीचा खालावलेला आलेख पुन्हा कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्याने वाढू लागले आहेत. गेल्या आठवडयात सारंगखेडा, टेंभा, कळंबू ,अनरद, बामखेडा परिसरात चोरीच्या घटनाची नोंद झाली आहे. चोरट्याकडे चाकूचे हत्यार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीसांपुढे आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT