nandurabar zp
nandurabar zp 
उत्तर महाराष्ट्र

जाळपोळ प्रकरणी भाजपच्या या जि.प. सदस्यास अटक

सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार : अक्कलकुवा येथील शिवसेनेचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कपील चौधरी यांना पोलिसांनी जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीनंतर लगेच अटक केली आहे. 
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अक्कलकुवा येथे नऊ जानेवारीस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांचा संपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत त्या दिवशी अक्कलकुवा शहरात तणाव निर्माण झाला होता. अनेक घडामोडीनंतर शेवटी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कपील चौधरीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्या दिवसापासून चौधरी पोलिसांना चकमा देत होते. येथील जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चौधरी भाजपच्या गोटातून उपस्थित होते. निवड प्रक्रियेनंतर पोलिसांच्या नजरा चुकवत ते बाहेर पडत असतांना त्यांच्यावर नजर ठेवून असलेले एलसीबीचे तसेच अक्कलकुव्याच्या पोलिसांनी त्यांना जिल्हा परिषद आवारातच गाठले. त्याच ठिकाणी नाट्यमयरित्या अटक करण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT