saptashrungi gad
saptashrungi gad 
उत्तर महाराष्ट्र

देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीची अंतिम चाचणी सप्तश्रृंगी गडावर संपन्न

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक)  : सप्तश्रृंगी गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीची काल राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक व यशदाच्या पथकाने अंतिम चाचणी घेऊन प्रकल्पाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाय योजनांची पाहाणी केली आहे. दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनीही फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रकल्पाची पाहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. 

सप्तश्रृंगी गडावरील खाजगीकरणाच्या माध्यमातून साकारण्यात आलेला युक्रेननंतरचा भारतातील पहिला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण होत असून प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे आवश्यक प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई येथून आलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या खास पथकाने तसेच यशदाच्या पथकाने फ्यॅनिक्युलर ट्रॉलीची पाहाणी करुन चाचणी घेतली. तसेच या प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेले प्रवासी प्रतीक्षालय, नोंदणी कक्ष, कर्मचारी कक्ष, फलाट, निवास व्यवस्था, भाविकांच्या निवासासाठी २४ सर्वसाधारण व ६ व्हीआयपी सुट, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधा, उपहारगृह, अंतर्गत रस्ते, सुशोभिकरण आदी कामांची पाहणी केली. तसेच,  सुरक्षितेच्या दृष्टीने केलेल्या उपाय योजना, अग्निप्रतिबंधक उपाय योजनांची पाहणी केली.

दरम्यान खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलिस अधिक्षक संजय दराडे, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनीही फ्युनिक्युलर ट्रॉलीची पाहाणी करुन ट्रॉलीने श्री भगवती मंदिरात जाण्या येण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती करुन घेतली.

सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, गुरुबक्षाणी रोपे वे ट्रॉलीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करीत आवश्यक सूचना केल्या.  तसेच, या सर्वांनी विविध विभागाचे अधिकारी, सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, गुरुबक्षाणी कंपनीचे अधिकारी, ग्रामस्थ  यांची आढावा बैठक घेऊन गडावरील प्लॅस्टिक बंदी व स्वच्छता अभियाना बाबतची माहिती घेवून सूचना केल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी अमन मित्तल, तहसिलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी बहीरम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कळवण उपविभागीय अभियंता कांकरेज, उपअभियंता केदार, गुरुबक्षाणी रोप वेचे व्यवस्थापक राजीव लुंबा, न्यासाचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश गवळी, सदस्य गिरीश गवळी, गणेश बर्डे, ग्रामस्थ संदिप बेनके, तुषार बर्डे, ग्रामसेवक रतीलाल जाधव आंदीसह व्यापारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT