school
school 
उत्तर महाराष्ट्र

दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

रोशन खैरनार

सटाणा  : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील यशश्री जाधव व अनुष्का अहिरे या दोन विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यामुळे त्यांची राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. 

भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील हिंदी माध्यमिक विद्यालयात नुकतेच जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील यशश्री बाजीराव जाधव (इयत्ता दहावी) या विद्यार्थिनीने 'रोबोटिक फायर फायटर' तर अनुष्का सुहास अहिरे (इयत्ता आठवी) हिने 'आधुनिक ट्रेन' हे उपकरण सादर केले होते. प्रदर्शनात या दोन्ही उपकरणांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या विद्यार्थिनींना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक व विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती यतींद्र पाटील व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या हस्ते या विद्यार्थिनी व शिक्षक सचिन शेवाळे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या उपकरणांसाठी प्राचार्या एस.बी.मराठे, वाय.एन.पवार, एम.बी.सोनवणे, रमाकांत भामरे, व्ही.एस.अहिरे, जे.बी.देवरे, आर.डी.आहेर, जी.बी.भामरे, डी.बी.सोनवणे, एम.एम.पगार, ए.जे.पवार आदी विज्ञान शिक्षकांनी सहकार्य केले. या यशाबद्दल मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, उपसभापती राघोनाना अहिरे, तालुका संचालक डॉ.प्रशांत देवरे आदींनी अभिनंदन केले आहे. 

राज्यस्तरावर निवड झालेली उपकरणे 
'रोबोटिक फायर फायटर' : अग्निशमन दलाच्या जवानांना कोणत्याही प्रकारच्या आगीजवळ प्रत्यक्ष न जाता या उपकरणाद्वारे लांब अंतरावरून रिमोटच्या सहाय्याने आगीवर सहजरित्या नियंत्रण मिळविता येते. 

'आधुनिक ट्रेन' : या उपकरणाद्वारे रेल्वेत होणाऱ्या अपघातांना रोखता येतात. या उपकरणातून वापरल्या जाणाऱ्या इन्फ्रारेड ट्रान्समीटर, ऑब्टीक सेन्सर, हिट सेन्सर यातून अपघातसमयी रेल्वेची गती आपोआप कमी होते आणि आग लागल्यास रेल्वेत आपोआप पाण्याचे पंप सुरु होऊन आगीवर नियंत्रण मिळविता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT