residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे राज्यभरातील शहीदांची जागवणार स्मृती 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीसांना अभिवादन करण्यासाठी 21 ऑक्‍टोबर या दिवशी देशभरात शहीद पोलिसांना अभिवादन केले जाते. यंदा या निमित्ताने नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. ज्याअंतर्गत पोलीस स्मृती दिनी त्या शहीद पोलीसांच्या कुटूंबियांची भेट घेऊन स्मृतिचिन्ह प्रदान केले जाईल. तसेच जे त्या शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षित झाले, त्याठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या पराक्रमाची महती सांगत प्रोत्साहीत केले जाणार आहे. 
... 
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून सदरचा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ज्या 9 शहीद जवान व पोलीसांनी कर्तव्यावर असताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती, त्या शहीद जवान व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांची पोलीस अधीक्षक संजय दराडे हे भेट घेणार आहेत. या भेटीत ते कुटूंबियांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देणार आहेत. तसेच या शहीद जवान व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पराक्रमाची माहिती शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने ते त्या जवानांनी ज्या शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्याठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतिदिनाचा उपक्रम राबविला जाणार आहे. 

* शहीद पोलीस नाईक बाळू सुखदेव गांगुर्डे (मु.पो. शेरी, ता. देवळा, जि. नाशिक) हे भिवंडी येथे कर्तव्यावर असताना गुन्हेगारांच्या सशस्त्र हल्ल्यात 2006 मध्ये शहीद 
* शहीद संजय दौलत भामरे (रा. वाखारी, ता. देवळा, जि. नाशिक) हे 1995 मध्ये सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना जम्मू-काश्‍मिर येथे अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात शहीद. 
* शहीद भगतसिंग परदेशी (रा. लोहोणेर, ता. सटाणा, नाशिक) हे मालेगाव येथे कार्यरत असताना दरोडेखोरांच्या गोळीबारात 1991 मध्ये शहीद. 
* शहीद जवान संदीप सोमनाथ ठोक (रा. खडांगळी, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे सैन्यदलात असताना 2016 मध्ये जम्मू-काश्‍मिर येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद. 
* शहीद पोलीस नाईक अरुण रघुनाथ चित्ते (रा. विरगाव, ता. सटाणा, जि. नाशिक) हे मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी विजय साळस्कर यांच्या वाहनावर चालक असताना अतिरेक्‍यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद. 
* नाशिक पोलीस आयुक्तालयातील शहीद पोलीस नाईक जगदीश मुरलीधर लोंढे (रा. सिन्नर, जि. नाशिक) हे 1999 मध्ये वाद मिटविताना संशयितांनी केलेल्या हल्ल्यात शहीद. 
* शहीद जवान परशराम शेळके (रा. बहादुरी, ता. चांदवड, नाशिक) हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना 1999 मध्ये कारगील युद्धात शहीद. 
* शहीद पोलीस शिपाई भास्कर भिमाजी सानप (रा. राजापूर, ता. येवला, जि. नाशिक) हे 1991 मध्ये मालेगाव येथे दरोडेखोराच्या गोळीबारात शहीद. 
* शहीद पोलीस नाईक सुरेश शंकर भाबड (रा. चासनळवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे रायगड पोलीस दलात कार्यरत असताना, 2006मध्ये रात्रगस्तीवर होते. त्यावेळी ते गुन्हेगारांविरोधातील कारवाईत शहीद. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT