residenational photo
residenational photo 
उत्तर महाराष्ट्र

गोदावरीच्या स्वच्छतेसाठी तरंगत्या सायकलचा प्रयोग 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या पूर्वसंध्येला आज नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तरंगत्या सायकलच्या प्रयोगाची चाचणी यशस्वी झाली. इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी संशोधनातून सायकलची निर्मिती केली आहे. सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे नाशिककरांनी कौतुक केले. 
सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्‍स तयार केला. त्यात झाकणबंद आठ रिकामे पाण्याचे जार बसवण्यात आलेत. त्यामुळे नदीमध्ये सायकल उतरवल्यावर ती तरंगत असल्याचे शहरवासियांनी पाहिले. पानवेली काढण्यासाठी तरंगत्या सायकलच्या पुढील बाजूस विशिष्ठ पद्धतीची रचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे तरंगत्या सायकलचा उपयोग गोदावरीच्या प्रदुषण मुक्तीसाठी मोठा फायदा होणार आहे. 
जगविख्यात शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांच्या सिद्धांतानुसार जेंव्हा आपण वस्तू पाण्यात बुडवतो, तेंव्हा त्याच्या वजनात घट होते. ज्या वस्तूची घनता कमी असते, तेंव्हा ती पाण्यावर तरंगते आणि घनता वाढली तर ती पाण्यात बुडते. वस्तूची घनता आणि घनफळ हे व्यस्त प्रमाणात असते. या सिद्धांताचा अभ्यास इस्पॅलियरच्या विद्यार्थ्यांनी उपयोगी पडला आहे. रिकाम्या जार मधील हवेचा दाब आणि प्लास्टिकमुळे सायकल पाण्यावर तरंगते. पॅंडलचा उपयोग पाण्यावर सायकल चालवण्यासाठी केला जातो. सायकलच्या पुढे लोखंडी पट्टी बसविण्यात आली असून तिला प्लास्टिकचे जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीच्या माध्यमातून पाण्यात असलेला कचरा, प्लास्टिक, पानवेली, हिरवे गवत असे सर्व काही सहजगत्या काढता येते. विद्यार्थ्यांनी त्यासंबंधीचे प्रात्यक्षिक गोदावरीमध्ये करुन दाखवले. नदीच्या प्रदूषण निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांची ही तरंगती सायकल बहुउपयोगी ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आर्किमिडीज युरेका असा जयघोषही केला. विज्ञान विषयाच्या शिक्षिका कल्याणी जोशी, जॅक्‍सन नाडे, मुख्याध्यापिका अंकिता कुर्या यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. 

""अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी संशोधन व कल्पकतेचा योग्य वापर करत तरंगती सायकल तयार केली आहे. या सायकलचा वापर करून गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ 
करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.'' 
- सचिन जोशी (शिक्षण अभ्यासक, इस्पॅलियर स्कूल) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT