उत्तर महाराष्ट्र

नागपुर-सुरत महामार्गावर अठरा लाखाची बियर पकडली

उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गाडीला बांधलेली ताडपत्री उघडली

सकाळ वृत्तसेवा



नवापूर : विसरवाडी (ता. नवापूर ) पोलिसांनी (visarwadi police) शुक्रवारी (ता. १८) रात्री साडेअकराच्या सुमारास अठरा लाखाची विदेशी बियर (Beer) पकडली. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधून कर चुकवत अठरा लाखाची विदेशी बिअर (दारु) मालट्रकसह गैरफायदा विना परवाना भरून ती गुजरात (Gujarat) राज्यात अवैधरीत्या वाहतूक करताना मिळुन आली. विसरवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (police caught a beer transporting illegally)

उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मध्यप्रदेशकडुन गुजरात राज्यात (एमएच १९, सी वाय २४०३) या क्रमांकाच्या टाटा अल्ट्रा ट्रकमध्ये विदेशी बिअर विना पास परमीट वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

मका सांगितला आणि निघाली बिअर

विसरवाडी पोलिस अधिकारी व कर्मचारी नवापूरकडे जाणाऱ्या नागपुर- सुरत राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी हॉटेल समोर रस्त्यावर वाहने चेक करीत असताना रात्री साडेअकराच्या सुमारास विसरवाडीकडुन ट्रक (एमएच १९, सी वाय २४०३) येताना दिसली. ट्रकला गाडीच्या दोन्ही चालकांना विचारपूस केली. रामकृष्ण पंडीत पाटील (वय-२६ , रा. वराड, ता. धरणगाव) व सुनील श्रीराम पाटील (वय ४०, रा. बोराडी ता. शिरपुर) या दोन्ही चालकांनी ट्रकमध्ये मकी असल्याचे सांगीतले. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गाडीला बांधलेली ताडपत्री उघडली असता मालट्रकमध्ये विदेशी बिअरचे खोके आढळुन आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT