live
live 
उत्तर महाराष्ट्र

साठवलेला कांदा सडला,कवडीमोल भावाऐवजी उकीरड्यावर

सकाळवृत्तसेवा

निमोण -  कांद्याचे भाव वाढले असले तरी प्रत्यक्षात ह्या  भाववाढीचा चांदवड तालुक्यातील  शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. साठवलेल्या उन्हाळ कांद्यापैकी सत्तर टक्के कांदा चाळीत च सडला आहे.काही कांदा कवडीमोल भावात विकला.काद्यांच्या भाववाढीने तालुक्यातील शेतकऱ्यांना अजिबात आनंद नाही.भाववाढी अगोदर च बहुतांश कांदा उकीरड्यावर गेला आहे.  

कांद्याचे माहेर घर असलेल्या चांदवड तालुक्यात मागील वर्षी तिन हजार हेक्टर उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती. यापैकी बहुतांश कांदा शेतकऱ्यांनी काढणीनंतर चांगला भाव मिळेल  या अपेक्षेने चाळीत साठवला होता.दहा हजार टन कांदा जुलै अखेर पर्यंत चाळीत होता. मात्र प्रचंड उष्णतेमुळे बहुतांश कांदा चाळीत च सडला. पोटच्या पोरासारखा सांभाळलेला कांदा सडलेला पाहून बळीराजा हताश झाला. सडलेला कांदा उकीरड्यावर फेकून द्यावा लागला. उरला सुरला कांदा सडण्याच्या भितीने सप्टेंबर अखेर पर्यंत कवडीमोल भावातच विकावा लागला. आता तालुक्यात जेमतेम तिन हजार टन कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. 

    या वर्षी तालुक्यात खरीप कांद्याची विक्रमी सतरा हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. मात्र पाऊस झाला च नाही.खरीपाची नव्वद टक्के लागवड पावसाअभावी धोक्यात आली. खरीप कांदा नाही. उन्हाळ चाळीत सडला. म्हणूनच भाववाढीने शेतकरी अजिबात आनंद नाही.
     

* दोन एकर उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. चारशे क्विंटल कांदा चाळीत साठवला.त्यातील अडीचशे क्विंटल कांदा सडल्याने उकीरड्यावर फेकावा लागला.काही कांदा कवडीमोल भावात विकला.
       पंकज दखणे , शेतकरी, निमोण ता.चांदवड


* उन्हाळ कांदा लागवड - तिन हजार हेक्टर
* उत्पादन - चौदा हजार टन
* साठवणूक - दहा हजार टन
* शेतकऱ्यांकडे शिल्लक - तिन हजार टन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT