live
live 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या लेकरांनी बनवलेल्या कांदा लागवड यंत्रांची देशभरात मोहर!

हर्षल गांगुर्डे

गणूर: मजूर टंचाईवर स्मार्ट पर्याय ठरलेल्या अविष्कार म्हणजे स्मार्ट ओनियन प्लांटर. याच अविष्कारास  एचआरडी मंत्रालय, भारत सरकार,एआयसिटीई, पर्सिस्टंट सिस्टिम्सतर्फे तामिळनाडू येथे घेण्यात आलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ या राष्ट्रीय स्पर्धेत हार्डवेअर ऍडिशनमध्ये पहिला क्रमांक व रोख एक लाख रुपये बक्षीस मिळाल्याने चांदवड येथील श्री.  नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व दुष्काळी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
 या अविष्कारातील अनेक विद्यार्थ्यांना शेतकरी कुटुंबाची पार्शवभूमी असल्याने शेतकऱ्यांच्या लेकरांनी बनवलेल्या या आविष्काराची देशभर मोहर उमटली आहे. 

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ हा देशभरातील नामी संस्थांनांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात व आपल्या नवकल्पनांचा,  आपल्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करतात.  जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल.  स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये याआधीही २०१७ मध्ये चांदवड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता व आता दुसऱ्यांदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. 
   ऍग्रो यांत्रिकीजच्या चमूने बनविलेल्या स्मार्ट ओनियन प्लांटरद्वारे आपण  वाफे तयार करणे,  खत पसरविणे, ट्रिप पसरविणे, कांदे लागवड करणे असे खुप सारे काम करू शकतो. पाच दिवसीय या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी ३६-३६ तास अथक परिश्रम घेतले व यात ग्रुपचे सल्लागार म्हणून  सुहासजी  लभडे यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगितलेल्या बदलांमुळे प्रथम पारितोषिक पटकाविणे  सोयीस्कर झाले. या स्पर्धेत प्रकल्प प्रमुख म्हणून अश्विनी खैरे हिने काम बघितले तसेच देविदास नवले, वृषभ पोफळी,  निखिल सहाणे,  बापू जाधव, प्राची खिवंसरा   या विद्यार्थ्यांचाही यात महत्त्वाचा वाटा होता.  विद्यार्थ्यांना प्रा. व्ही. सी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती व प्रकल्प समन्वयक प्रा. आर. एस.  चौधरी यांचेही  सहकार्य लाभले.  

या यशाबद्दल संस्थेचे प्रबंध समितीचे अध्यक्ष  बेबीलालजी संचेती, महाविद्यालयाचे  समन्वयक  दिनेश कुमारजी लोढा, झुंबरलालजी भंडारी, सुनीलकुमारजी चोपडा,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  एम. डी.  कोकाटे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेतकरी या समाज व्यवस्थेचा व अर्थकारणाचा कणा आहे.महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व विद्यार्थानी समाजपयोगी संसोधन केले आहे . स्मार्ट ओनियन प्लांटर या प्रकल्पामुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे, हा क्षण महाविद्यालया करता देखील गौरवाचा आहे. 
- प्राचार्य डॉ. महादेव कोकाटे
 

   कांदा  हे पीक  नाशिक जिल्हातील अत्यंत महत्वाचे पीक आहे, विद्यार्थानी आपल्या ज्ञानाचा व अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून हे यश संपन्न केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थानी केलेले हे संशोधन  कांदा लागवडी  प्रकियेतील एक मैलाचा टप्पा ठरावा या दृष्टिकोनातून देखील आमचे प्रयन्त सुरु आहेत. 
- बेबीलालजी संचेती, अध्यक्ष प्रबंध समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT