उत्तर महाराष्ट्र

"कोरोना'चे संकट, त्यात वादळ...कर्तव्य बजावितांना भारतीय सुपूत्राचा अमेरीकेत मृत्यू ! 

सकाळवृत्तसेवा

पारोळा : वर्षी ता,शिंदखेडा येथील तिलक मधुकर चौधरी (वय40) यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अपघाती निधन झाले. भारतीय वेळेनुसार ता, 29 रोजी सकाळी दहा ला ही घटना घडली आहे. वर्षी येथील डॉ.मधुकर बळीराम चौधरी, शिंदखेडा पंचायत समितीच्या माजी सदस्य तथा वर्षीच्या माजी सरपंच वंदनाबाई चौधरी यांचे ज्येष्ठ पुत्र तिलक हा पंधरा वर्षापासून अमेरिकेतील औषधी कंपनीत फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होता.

अमेरिकेत कोरोणामुळे लॉक डाऊन आहे. अत्यावश्यक सेवेमुळे तिलक कंपनीत कार्यरत होते. घरापासून कंपनी सुमारे शंभर किलोमीटरवर आहे. घरी येत असताना वादळात त्यांची कार महामार्गालगतच्या झाडाला धडकल्याने त्यांच्या त्यात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी व दोन मुले अमेरिकेतच आहेत. विमानसेवा बंद असल्याने मोठा पेच निर्माण झाला तेथील पोलिसांनी डॉक्टर चौधरी कुटुंबियांना घटनेची माहिती देताच त्यांना मानसिक धक्का बसला. कोरोनामुळे तिलक यांच्या पत्नीही तेथील पोलिस ठाण्यात पोहोचू शकलेल्या नाहीत.

तिलक यांचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर अमेरिकेतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. पोटच्या मुलाचे अंतिम दर्शनही होऊ शकणार नसल्याने तिलक यांच्या आईवडिलांची अवस्था केविलवाणी झाली होती. तिलक हा पारोळा निवृत्त वीज वितरण कंपनी चे कर्मचारी रमेश निंबा चौधरी यांचा मुलगा मधुकर रमेश चौधरी पुणे यांच्या शालक होता. तीलकच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ डॉक्टर संदीप, एक बहिण प्रेरणा, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT