live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सहाय्यक फौजदाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावताना सहाय्यक फौजदार सुरेश रघुनाथ पाटील (वय 57) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घडली. शहर पोलिस ठाण्यात सहकाऱ्यांसमवेत वाढदिवसानिमित्त केक कापल्यानंतर काही वेळाने सुरेश पाटलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. 

नांदेड (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी सुरेश रघुनाथ पाटील (वय 57, रा. चंदुअण्णा नगर निमखेडी) हे चार वर्षांपासून शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत आहेत. सुरेश पाटील यांचा शुक्रवारी (ता. 19) रोजी वाढदिवस होता, ठाणे अंमलदार म्हणून त्यांची रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ड्यूटी असल्याने ते वेळेतच पोलिस ठाण्यात हजर झाले. पदभार घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण निकम यांच्यासह सहकाऱ्यांनी रात्री 10:30 वाजता केक कापून त्यांचा 57 वा वाढदिवस साजरा केला. मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, थंडघाम सुटून ते बेशुद्ध पडले. तत्काळ त्यांना शहरातील मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केल्यावर तपासणी अंती डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

सरळ स्वभावी माणूस 
सुरेश पाटील यांची तीस-पस्तीस वर्षे पोलिस खात्यात नोकरी झाली असून सेवानिवृत्तीला अवघे काही वर्ष शिल्लक होते. कुटुंबात पत्नी उज्वला आणि हितेंद्र, महेंद्र आणि हर्षल असे तीन मुले आहेत. हितेंद्र पोलिस खात्यात, तर महेंद्र शिरपूर बॅंकेत नोकरीला आहे. हर्षल लहान आणि गतीमंद असल्याने त्यांचा विशेष लाडका होता. पोलिस खात्यात अनेक चढ-उतारांसह जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात सेवा बजावली. सरळ स्वभावी आणि कामाशी काम ठेवणारा ज्येष्ठ सहकारी म्हणून ते अधिकाऱ्यांमध्ये परिचित होते. 

घटनेने सहकारीही सुन्न 
सुरेश पाटील शनिवारी सकाळी इतर सहकाऱ्यांसह जामनेर बंदोबस्ताला जाणार होते. रात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर काही सहकारी घरी गेले. तोच रात्री एक वाजता वाईट बातमी कानी पडली. काहींची निवडणूक बंदोबस्तावर दुसऱ्या तालुक्‍यात ड्यूटी लागल्याने जावे लागले. दिवस उजाडताच व्हॉटस्‌ऍपवर निधन वार्ता कळल्यावर सहकाऱ्यांना धक्काच बसला. कर्तव्य बजावतानाच वाढदिवसाच्या दिवशी क्रूर काळाने झडप घातल्याने सुरेश पाटलांचे जाणे सहकाऱ्यांना चटका लावणारे ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT