residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात......म्युझिक इव्हेंटला परवानगीसाठी मागितली लाच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर धरणालगत असलेल्या सुला वाईनच्या संगीत कार्यक्रमाच्या परवानगीसाठी 22 हजार रुपयांची लाचेची मागणी केली आणि लाचेची रक्कम नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या दालनात स्वीकारतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. ज्या पोलीस ठाण्याचा प्रमुख, त्याचठिकाणी प्रमुखाविरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
... 
नानासाहेब रामकिशन नागदरे (52) असे नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव असून, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे (55) असे दोघा लाचखोरांचे नाव आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, येत्या शनिवारी (ता.7) सुला वाईन येथे म्युझिक इव्हेंट होता. त्यासाठी त्यांनी बुधवारी (ता.4) नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी लाचखोर नागदरे याने त्यांच्याकडे परवानगीसाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती ठरले 22 हजार

     तडजोडीअंती 22 हजार रुपये देण्याचे ठरले. आज (ता.5) पुन्हा ते नाशिक तालुका पोलीस ठाण्यात परवानगीसाठी गेले असता, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष देवरे यानेही 9 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, शहानिशा केल्यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आज (ता.5) सकाळपासून सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार, पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे त्यांच्या दालनात आल्यानंतर दोघा लाचखोरांना तक्रारदाराने लाचेची 22 हजार रुपयांची रक्कम दिली. त्यानंतर दबा धरून असलेल्या लाचलुचपतच्या पथकाने दोघांना रंगहाथ जेरबंद करण्यात आले आहे. 

एसीबी पथकाची कारवाई

हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सतिश भामरे, पोलीस कर्मचारी नितीन कराड, प्रविण महाजन, मनोज पाटील, पवार यांच्या पथकाने बजावली. 

तीन महिन्यापूर्वीच पदभार

   लाचखोर नानासाहेब नागदरे यांनी तीन महिन्यापूर्वीच नाशिक तालुका पोलीस ठाण्याचा पदभार घेतला होता. त्यापूर्वी येवला पोलीस ठाण्याचे त्यांनी काम पाहिले होते. तर, गेल्याच आठवड्यात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक तालुका पोलीसात पत्रकार परिषद झाली असता, त्यावेळी तालुका हद्दीतील अवैध धंद्यांबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या असता, या धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अधीक्षकांनी दिले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT