residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामीण भागात सुमार दर्जाच्या हेल्मेटची सर्रास विक्री;

वैभव तुपे

तळेगाव : दुचाकी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नुकतीच जिल्ह्याच्या  ग्रामीण भागातही दुचाकी चालकांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या हेल्मेटसक्तीचा फायदा घेत ग्राहकांना स्वस्तात हेल्मेटचे अमिष दाखवत सुमार दर्जाचे हेल्मेट विकण्याचा प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. 

एक फेब्रुवारी पासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. विनाहेल्मेट बाईकस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जात असून विनाहेल्मेट दुचाकी चालवतांना आढळल्यास वाहतूक पोलिसांकडून पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. अनेकांनी या आर्थिक भुर्दंडाच्या धास्तीने हेल्मेट खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. आणि त्यामुळे हेल्मेटच्या मागणीतही  मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याच गोष्टीचा फायदा हेल्मेट विक्रेत्यांकडून घेतला जात असून ग्रामीण भागात अगदी रस्त्याच्या कडेला हातगाडीवर स्वस्तात हेल्मेट विकण्याचा धंदा सध्या तेजीत आहे.

      चांगल्या दर्जाचे हेल्मेट साधारण आठशे ते दोन हजार रूपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. असे असतांना हातगाडीवर  अवघ्या दोनशे ते चारशे रूपयात हेल्मेट विक्री जोरात सुरू असून स्वस्त किमतीमुळे ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर या हेल्मेटला पसंती देतांना दिसून येत आहेत. हजार बाराशे रुपये खर्चून हेल्मेट घेणे किंवा मग दरवेळी पाचशे रुपये दंड भरणे या दोन्हींच्या मधला पर्याय म्हणून अनेक ग्राहक या स्वस्त हेल्मेटची खरेदी करत आहेत. मात्र स्वस्तात मिळणाऱ्या या हेल्मेटचा दर्जा अत्यंत सुमार असून दुर्दैवाने एखाद्याचा खरंच अपघात झाला तर या हेल्मेटमुळे डोक्याचे कितपत संरक्षण होईल याबद्दल शंका यावी इतक्या सुमार दर्जाचे हे हेल्मेट आहेत. केवळ पोलीस कारवाई पासून वाचण्यापुरतीच त्याची मदत होऊ शकते. मात्र सुरक्षिततेचा विचार न करता पाचशे रुपये दंड भरण्यापेक्षा तीन-चारशे रुपयात हेल्मेटच विकत घेणे काय वाईट असा विचार दुचाकीधारक करतांना दिसत आहे. 

"हेल्मेटसक्ती निर्णय हा दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच घेण्यात आला आहे, हेल्मेट सक्ती केवळ कारवाईपुरती मर्यादित राहू नये. ग्राहकांनी हेल्मेट खरेदी करतांना चांगल्या दर्जाच्या हेल्मेटला प्राधान्य द्यावे."
- संजय लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस ठाणे, इगतपुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT