PROGM PHOTO
PROGM PHOTO 
उत्तर महाराष्ट्र

कलांच्या साधनेतून कुसुमाग्रजांचे स्मरण..! 

सकाळवृत्तसेवा

नाशिकः कुणी गायनात तल्लीन होऊन, तर कुणी रंगरेषांमध्ये रमताना, तर कुणी नृत्याविष्कार सादर करत अशा विविध कलांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे स्मरण कलावंतांनी केले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरे होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत यंदाचा "सकाळ कलांगण' गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानात आयोजित केला होता. कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कुसुमाग्रजांबरोबर सहवास लाभलेल्या व्यक्‍तींनी किस्से सांगताना आपल्या आठवणींना उजाळा दिला. 
"सकाळ कलांगण'च्या यंदाच्या 23 व्या उपक्रमाप्रसंगी "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, कवी किशोर पाठक, कुसुमाग्रजांचे केश कर्तनकार रमेश जाधव, अधिष्ठाता बाळ नगरकर, अदिती पानसे, प्राप्ती माने, मुकुंद बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्यानात सकाळी व्यायाम, फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही कार्यक्रमात सहभागी होत मनमुराद आनंद घेतला.
सूर्याच्या रखरखत्या किरणांमुळे उजळलेल्या उद्यानातील नयनरम्य दृश्‍य कॅनव्हासवर उतरविण्यासाठी चित्रकारांनी उद्यान परिसरात ठाण मांडले होते. अगदी हौशी बालचित्रकारांपासून दिग्गज चित्रकारांनी आपल्या दृष्टीतून उद्यान व परिसराचे, निसर्गाचे सौंदर्य रेखाटले. कुणी जलरंग, तर कुणी ऍक्रलीक रंग, खडू-पेन्सीलच्या रंगांनी चित्रकारांनी आपापले चित्र रेखाटले. चित्रकार चित्र साकारताना त्यांच्या सभोवती कलाप्रेमींनी गर्दी केली होती. यामुळे चित्रकारांचाही उत्साह वाढला होता. 
या प्रसंगी प्राचार्य अनिल अभंगे, प्राचार्य मुंजा नरवाडे, श्री कालिका मंदिर ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजिया, "तान'चे नीलेश शर्मा, सुमंत खराटे, मुख्याध्यापक राजेंद्र निकम, "एलआयसी'चे अधिकारी राजू रायमले, चित्रकार भारती हिंगणे, अतुल भालेराव, प्रफुल्ल चव्हाण, प्रमिला भामरे, रमेश जाधव, विवेक पानसे, सविता पानसे, मुकुंद पानसे, विजय निपाणेकर, "नावा'चे सरचिटणीस दिलीप निकम आदी उपस्थित होते.
अन्वी, गरीमा, शुभम यांचा उत्स्फूर्त सहभाग 
कलेला वयाचे बंधन नसते, हे आजच्या उपक्रमांतून बालकवींनी उदाहरणादाखल सिद्ध करून दाखविले. आठवीत फ्रावशी ऍकॅडमीमध्ये शिकणाऱ्या अन्वी पानसे हिने कविवर्य कुसुमाग्रजांची "माझ्या बागेत बागेत' ही कविता सादर करताना उपस्थितांचे लक्ष वेधले. या वेळी तिने कवितेला साजेशे हावभाव करताना सुरेल आवाजात म्हटलेल्या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली. अशोका स्कूलमध्ये शिकणाऱ्या गरीमा शर्मा या चिमुकलीनेही सुंदर पद्धतीने कविता सादर केली. शिलापूर येथील जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या शुभम पगार याने "आई माझी' कविता सादर करताना आईविषयीची प्रेमभावना व्यक्‍त करत वातावरण काहीसे भावूक केले. 

वेडात मराठे वीर दौडले सात... 
कुसुमाग्रज जयंती अर्थात मराठी राजभाषा दिन मंगळवारी (ता. 27) असल्याने या संकल्पनेवर आधारित संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण नाशिक म्युझिक क्‍लबतर्फे करण्यात आले. मुकुंद बोरसे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या वेळी संस्थापक डॉ. हितेश कारिया, नंदिनी कारिया, समीर देसाई, प्रमोद कापडणे, मुकुंद बोरसे, अनिल चौधरी, शैलेंद्र बकरे, सुहास सातव, राहुल परघरमोल, हेमलता डिसोजा, वैशाली बोकील, सोनल निकम, वृषाली खर्डे, सुरेखा चौधरी या कलावंतांनी आपल्या सुरेल आवाजात कराओके संगीताच्या साथीने सुंदर अशी गाणी सादर केली. "वेडात मराठे वीर दौडले सात...' या गाण्यापासून तर विविध मराठी, हिंदी गाण्यांनी उपस्थितांचे निखळ मनोरंजन केले. 

कथक नृत्याविष्काराने वेधले लक्ष 
दर महिन्याच्या "सकाळ कलांगण'चे आकर्षण ठरत असलेल्या किर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी यंदाही मन मोहनारे नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधले. "सजल शाम घन गरजत आले...' या गाण्यावर क्षीतिजा जोशी, मैथिली कुलकर्णी, सृष्टी तेजाळे यांनी लयबद्ध कथक नृत्य सादर केले.

कवी राहुल कहांडळच्या 
पाठीवर कौतुकाची थाप 
"तो मुलगी बघायला गेला, मुलगी पसंत केली अन्‌ सर्व प्रथांना फाटा देताना त्याच दिवशी विवाह बंधनात बांधलाही गेला.' समाजाने प्रतिष्ठेचा विषय बनविलेल्या लग्नसोहळ्याची नवी संकल्पना मांडणाऱ्या कवी राहुल कहांडळचाही उपक्रमात सत्कार करण्यात आला. राहुल "सकाळ कलांगण' उपक्रमाशी जोडला गेला आहे. राहुलसह त्याची पत्नी निशा कहांडळ, आई जिजाबाई कहांडळ व रोशन कहांडळ यांचेही स्वागत व अभिनंदन करण्यात आले. 

वेगवेगळ्या कलांचा संगम आज या "सकाळ कलांगण'मध्ये पाहायला मिळतो आहे. कविवर्य कुसुमाग्रजांच्या शिकवणीतून कला निसर्गाला अर्पण करण्याची शिकवण त्यांनी दिली. आजही त्यांच्या आठवणी प्रेरणा देणाऱ्या ठरतात. 
- किशोर पाठक, ज्येष्ठ कवी 

दिवसभरातील बहुतांश वेळ कुसुमाग्रजांसोबत राहत असल्याने त्यांच्यासोबतच्या भरपूर आठवणी आजही हृदयात घर करून आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आजही डोळे पानवतात. केवळ त्यांच्या सहवासामुळेच अनेक दिग्गज कलावंत आजही भेट घेत असल्याचे मनस्वी समाधान आहे. 
- रमेश जाधव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT