scholarship
scholarship 
उत्तर महाराष्ट्र

बारावीच्या परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जासाठी रांगा   

अरूण मलानी

नाशिक : करीअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समजल्या जाणाऱ्या इयत्ता बरावीच्या परीक्षांना उद्या (ता.21) सुरवात होत आहे. आज शहरातील विविध महाविद्यालयांत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफलाईन स्वरूपात अर्ज भरण्याच्या सुचना दिल्याने विद्यार्थ्यांवर रांगा लावण्याची वेळ ओढावली. परीक्षेचा अभ्यास बाजूला ठेवत विद्यार्थ्यांना रांगेत उभे रहावे लागल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती व्यक्‍त होत आहे. यामुळे पालक वर्गात संतापाचे वातावरण आहे. 
हक्‍काची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दमछाक करावी लागते आहे. तसे तर सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी गैरसोय होते आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर कहरच झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अभ्यासात दंग होते. अनेकांकडून अभ्यासाच्या उजळणीला सुरवात झाली होती. उद्या (ता.21) पासून बारावीच्या परीक्षेला सुरवात होत असल्याने, अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे, काही काळ विश्रांती घेणे अपेक्षित असतांना, तसे न होता विद्यार्थ्यांना रांगेत रहावे लागत आहे. सायंकाळी उशीरापर्यंत रांगा कायम होत्या. परीक्षेच्या ऐन एक दिवस आधी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने पालकांकडून संतप्त प्रतिक्रीया व्यक्‍त केल्या जात आहेत. 

परीक्षेचा काळ लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास परीक्षेनंतरच्या कालावधीपर्यंत मुदत देण्यात यावी. विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. शासनाने शैक्षणिक शुल्क पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करावे. यामुळे स्टॅम्प पेपर मिळविण्यासह अन्य बाबींची पूर्तता करण्यात होणारी पालक-विद्यार्थ्यांची दमछाक व नाहक खर्च टळेल. 
-प्रा.संजय शिंदे, 
सरचिटणीस, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT