उत्तर महाराष्ट्र

शहादा परिसरात सहा दिवसांपासून रिपरिप 

कमलेश पटेल

शहादा : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, पिकेही पिवळी पडू लागली आहेत. पिकांवर विविध आजार आले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे फवारणीही शक्य नाही. काही अंशी पिकांना आता उन्हाची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

श्रावणाच्या सरत्या शेवटी गेल्या सहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे पिकांवर अनेक विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सततच्या पावसामुळे फवारणी करणे शक्य नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. रिमझिम पावसामुळे शेतात पाणी साचून राहत आहे. परिणामी तालुक्यातील काही भागात अनेक दिवसांच्या खंडानंतर अचानक आलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यात प्रामुख्याने कापसाचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. जास्तीच्या पावसाने कापसाची फूल पाती, गळ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी ऊसही आडवा पडल्याने वजनात घट येते. पपई लागवड केलेल्या शेतकऱ्यांना तर बुरशीजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. मुळांना, खोडाला बुरशी लागून पपईचे बुंधे सडत आहेत. परिणामी ऐन फळधारणेच्या अवस्थेत असणाऱ्या पपईच्या झाडांची संख्या कमी होत आहे. अन्य पिकांची परिस्थितीही याप्रमाणेच आहे. 

नदी-नाले कोरडेच 
दरम्यान, जून महिन्यानंतर जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने आता बाहेर पाण्याचा टिपूसही निघाला नाही. त्यामुळे नदी-नाले अद्यापही कोरडेठाक आहेत. जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेले बंधारेही कोरडेठाक आहेत. रब्बी हंगाम घेण्यासाठी बोअरवेल्सची पाण्याची पातळी वाढावी यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

शहादा तालुक्यात मंडळनिहाय एकूण पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
शहादा- ५८० 
प्रकाशा- ४०६ 
कलसाडी- ५३७ 
म्हसावद- ५८९ 
ब्राह्मणपुरी- ५५८.८४ 
असलोद- ३८९ 
मंदाणे- ३३२ 
वडाळी- ३२७ 
सारंगखेडा- ३४१.९ 
मोहिदे- ४६१ 
एकूण-- ५२९० मिलिमीटर 
सरासरी- ५२९ 


संपादन-भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT