उत्तर महाराष्ट्र

त्या बावीस गावातील नागरिकांच्या नजरा निकालाकडे

कमलेश पाटील

 शहादा: कोविड -19 मुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.यात शहादा तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मुदत संपण्याच्या कालावधी दोन दिवसांवर येऊन ठेपला असून प्रशासक पदी एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते कि पालकमंत्र्यांच्या शिफारशीने गावातील व्यक्तीची सरपंच पदी निवड होते हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने त्या बावीस गावातील नागरिक अद्यापही संभ्रमावस्थेत आहेत. आपल्या गावाचा 'कारभारी' कोण होणार याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.


शहादा तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट महिन्यातील 21,24,31 या तारखांना संपत आहे. यातील बहुतांश ग्रामपंचायती राजकीय दृष्ट्या मोठ्या गावातील आहे. त्यामुळे इच्छुकांनी थोड्या कालावधीसाठी का होईना गाव कारभारी म्हणून गावाचा कारभार पाहण्याची संधी मिळेल यासाठी आपल्या परीने फिल्डिंग लावली आहे परंतु प्रशासक नेमावे की गावातील व्यक्तीलाच गाव कारभारी म्हणून संधी द्यावी हे अदयाप स्पष्ट नसल्याने गावातील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. शासनाने पालकमंत्र्यांना निवडीचे अधिकार दिले असले तरी याविषयी न्यायालयातही याचिका दाखल आहे त्यामुळे काय निर्णय लागतो याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.

औत्सुक्याचा विषय...
दरम्यान कोरोणाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता निवडणूक घेणे धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती शासनाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत निवडणुक आयोगाने निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासनाने संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना शासनाने जारी केलेल्या नियमात बसणाऱ्या व्यक्तीला त्या गावाचा गाव कारभारी म्हणून नियुक्तीचे अधिकार दिले आहेत.त्यामुळे इच्छुकांनी आपल्या पद्धतीने फिल्डिंग ही लावली. फिल्डिंग लावलेल्या पैकी कोणाची निवड होते हा ग्रामीण भागात औत्सुक्याचा विषय ठरला आहे. त्यातच या नियुक्त्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याच्या निर्णय अद्याप झाला नसल्याने नेमकी गावातूनच एखाद्या व्यक्तीची निवड होते की, शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी म्हणून गावाचा कारभार पाहतात हे अद्यापही अस्पष्ट आहे.


तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती
कुऱ्हावद त.सा.,तोरखेडा, दोंदवाडे,नांदरखेडा, बामखेडा त. त., मनरद,मोहीदे त.श., हिंगणी, कानडी त.श., कुकावल,टेंभे त. श., टेंभे त.सा.डामरखेडा,पुसनद,फेस, बामखेडा त.सा.,शेल्टी,सारंगखेडा, सोनवद त.श.,वढे त.श.,कौठळ त.सा.,कोठली त.सा. आदी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या व 198 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतींवर कोणाची नियुक्ती होते हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.  

नेर

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT