beer 
उत्तर महाराष्ट्र

कोरोनाने उतरवली ‘चिल्ड बिअर’ची नशा !

निलेश पाटील

शनिमांडळ : सर्दी, खोकला आणि ताप अशा कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांची धास्ती घेतल्याने २०२० मध्ये चिल्ड बिअरकडे तळीरामांनी पाठ फिरविली होती. राज्यात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये बिअरच्या विक्रीत तब्बल ४५ टक्‍क्‍यांची घट झाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे देशी आणि विदेशी मद्य रिचवणाऱ्या तळीरामांनी २०२० मध्ये ८० टक्के विक्रीचा टप्पा ओलांडल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात चांगलीच भर पडली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दर वर्षी कोट्यवधी बल्क लिटर बिअर, देशी दारू आणि विदेशी मद्याची विक्री होते. त्या तुलनेत राज्यात वाइनची विक्री लाखो लिटरमध्ये होते. बिअरबाबत तळीरामांची पसंती नेहमीच थंड म्हणजेच चिल्ड बिअरला असते. मात्र थंड पदार्थामुळे सर्दी होण्याचे प्रमाण अधिक असल्याने चिल्ड बिअरकडे तळीरामांनी पाठ फिरविल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागतात

याउलट गरम किंवा मध्यम स्वरूपात थंड असलेली बिअर पिण्यात मजा नसल्याचे काही तळीरामांनी सांगितले. त्यामुळे लॉकडाउनमध्ये काही तळीरामांनी दारूलाच राम राम केला असून, काहींनी दुसरे पर्याय निवडले. याचबरोबर लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना निम्माच पगार मिळाला. साहजिकच या गोष्टीचा परिणाम मद्यपींवर झाला. सर्वसाधारणपणे बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यापेक्षा कमी किमतीत इतर प्रकारची दारू मिळते. या दारूने नशाही अधिक होते. या कारणास्तव अनेक मद्यपींनी बिअर घेणे थांबविल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

२०२० या वर्षात केवळ ५५ टक्के बिअरची विक्री

दरम्यान, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये फक्त ५५.७२ टक्के बिअर विकली गेली. सर्वांत जास्त पसंती तळीरामांनी विदेशी मद्याला दिली आहे. विदेशी मद्याने २०२० मध्ये ८४.९७ टक्‍क्‍यांपर्यंत विक्री केली आहे. याउलट वाइनची विक्री ८२.८० टक्के, तर देशी दारूची विक्री ८०.४३ टक्‍क्‍यांपर्यंत झाली आहे. सर्व प्रकारच्या मद्याच्या विक्रीत घट झाल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलातही ११ हजार ५५४ कोटी रुपयांवरून नऊ हजार ७४७ कोटी रुपयांपर्यंत घट झाली आहे. महसूलवाढीसाठी बनावट मद्यविरोधातील कार्यवाही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

 
२०१९ व २०२० मधील मद्यविक्री 
(कोटी बल्क लिटरमध्ये) 

मद्याचा प्रकार वर्ष २०१९ वर्ष २०२० 
बिअर...... .......२३.४२ १३.०५ 
विदेशी मद्य... ...१६.२४ १३.८० 
देशी दारू........ २७.१४ २१.८३ 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai News: कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालय करणार घटनास्थळाची पाहणी; प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

SCROLL FOR NEXT