उत्तर महाराष्ट्र

कोरोना नाही तरी ही एकाच कुटुंबातील तिघांचा दोन महिन्यात मृत्यू !  

एल. बी. चौधरी

 सोनगीर ः नियती कधी कधी किती क्रूर होऊ शकते याचा प्रत्यय अमळगाव (ता. अमळनेर) येथील चौधरी कुटुंबाला आला. दोन महिन्यात एकाच घरातील आई, वडील व कर्ता मोठा मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


अमळगाव येथील शेतकरी कुटुंबातील दयाराम नारायण चौधरी (वय ८५) यांचे १५ ऑगस्ट २०२०ला निधन झाले. त्यांचे गंधमुक्त तथा उत्तरकार्य झाल्यानंतर नातेवाईक आपापल्या गावी पोहचत नाही, तोच त्यांची पत्नी दुर्गाबाई दयाराम चौधरी (वय ७९) यांचेही १२ सप्टेंबरला अल्प आजाराने निधन झाले. पुन्हा नातेवाईक मंडळी अमळगांवला पोहचली. आईबाबत सर्व सोपस्कार पूर्ण झाले. नातेवाईक आपापल्या घरी पोहचले. गेल्या महिन्यांपासून कामे ठप्प पडलेली असताना आता नेहमीचे जीवन सुरू होण्याची अपेक्षा असताना दयाराम चौधरी यांचा कर्ता मुलगा भटू दयाराम चौधरी (वय ५२) यांचे काल बुधवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास मुंबईत जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचावर गुरुवारी उल्हासनगर येथे अंत्यसंस्कार झाले. भटू चौधरी हे उल्हासनगरमध्ये फर्निचर कॉन्ट्रक्टर होते. त्यांच्यामागे पत्नी मीना व दोन मुले चेतन व प्रशांत आहेत. त्यांचा एक भाऊ गणेश चौधरी उल्हासनगरमध्ये पोलिस व प्रकाश चौधरी कल्याणला शिक्षक आहेत. सध्या कोरोनामुळे अनेक जण मृत्यू पावत असताना काही कुटुंबे बरबाद होत आहेत. मात्र अमळगांवमधील आई, वडील व मुलगा यांच्यापैकी कोणीही कोरोना बाधित नसताना मयत झाले. त्यामुळे आश्चर्यसह हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT