residenational photo
residenational photo 
उत्तर महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वरमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत आज प्राणप्रतिष्ठा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील निलगिरी पर्वतावर उभारलेल्या मॉं अन्नपूर्णा मंदिराचा उद्या (ता. 21) सकाळी पावणेअकराला प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे, अशी माहिती सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी महाराज यांनी दिली.
  नील पर्वतावर हे मंदिर 3 एकरावर उभारण्यात आले आहे. शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकच ठिकाणी असलेले त्रंबकेश्वर हे देशातील दुसरे ठिकाण आहे. वास्तूकलेचा अद्वितीय नमुना असलेले हे मंदिर पूर्णत: संगमरवरमध्ये साकारले आहे. मंदिर परिसरात भैरवनाथाच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अन्नपूर्णादेवीची मूर्ती 1 हजार 931 किलोग्रॅम, सरस्वती देवीची मूर्ती 750 किलोग्रॅम, तर महाकालीची मूर्ती 470 किलोग्रॅम वजनाची पंचधातूमध्ये साकारली आहे. अन्नपूर्णा अतिथी निवासाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा होणार असून श्रीमती महाजन भाविकांशी संवाद साधतील. प्राणप्रतिष्ठेनिमित्त 18 फेब्रुवारीपासून 32 हजार चौरस फूट आताराच्या यज्ञशाळेत लक्ष्यचंडी महायज्ञ होत आहे. तो 28 फेब्रुवारी पर्यंत चालेल. 
 
सुमित्रा महाजन यांचा दौरा 
मुंबईहून सरकारी विमानाने उद्या सकाळी साडेनऊला सुमित्रा महाजन ओझरकडे प्रयाण करतील. सकाळी दहाला त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. दहा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांचे आगमन त्र्यंबकेश्‍वर येथे होईल. साडेअकरानंतर अंजेनरीचे शिवशक्ती ज्ञानपीठ, सपकाळ नॉलेज हब आणि शहरातील काही ठिकाणी त्या भेट देतील. दुपारी  त्या मुंबईकडे विमानाने प्रयाण करतील. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT