residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

विपश्‍यना केंद्राच्या जागेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर  जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः इगतपुरी येथील जागतिक किर्तीच्या विपश्‍यना केंद्राचा दिड तपापासून जागेसाठीचा ग्रामीण पोलिसांशी सुरु असलेला संघर्ष आता थांबणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या मागण्या पूर्ण करतांना बेजार झालेल्या या केंद्राच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा यंत्रणाच आता पोलिसांना चौकी उभारुन देणार आहे. 

इगतपुरी येथील विपश्‍यना केंद्राला जिल्हा यंत्रणेकडून काही वर्षापूर्वी सुमारे 4.97 हेक्‍टर जागा दिली गेली. जागा अपुरी पडत असल्याने यंत्रणेकडून ग्रामीण पोलिसांच्या फायरिंगसाठी वापरली जाणारी जागा दिली गेली. यंत्रणेने जागा दिली. पण तेथूनच एका अर्थाने ग्रामीण पोलिस आणि विपश्‍यना केंद्रात वादही सुरु झाले. पोलिसांना त्याबदल्यात पिंपळद येथे फायरिंगसाठी जागा देण्यात आली. मात्र संबधित जागा एक सलग नसल्याने जागा एक सखल करण्यासाठी पोलिसांचा विपश्‍यना केंद्राकडे रेटा वाटला. त्यामुळे पोलिसांच्या फायरिंग रेंजच्या जागेच्या डागडुजीसाठी केंद्राला लाखोचा भुर्दंड आला. 

पोलिसांचे नव्या ठिकाणी कामकाज सुरु झाले. पण केंद्राची समस्या मात्र सुटली नाही. तब्बल 18 वर्षापासून पोलिसांकडून पोलिस चौकी बांधून मिळावी म्हणून विपश्‍यना केंद्राकडे पाठपुरावा सुरु होता. 

अखेर तोडगा निघाला 
एका पोलिस अधिक्षकांने चौकीचा आग्रह धरला,लगेच दुसऱ्यानेही धरला, दुसऱ्याने धरला म्हणून तिसऱ्यानेही मागणी केली. तब्बल 18 वर्षे 
पोलिस चौकीसाठी पोलिसांचा आग्रह कायम राहिला. पोलिसांच्या जागा सपाटीकरणापासून तर चौकी बांधून देण्यापर्यतच्या मागण्या पूर्ण करता करता मात्र मेटाकुटीला आलेल्या विपश्‍यना केंद्राने हा विषय जिल्हा यंत्रणेकडे आणला. अखेर गुरुवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे त्यावर तोडगा निघाला. पोलिसांच्या चौकीला जिल्हा नियोजन समितीतून बांधून देण्याचा पर्याय पुढे येतो आहे. 

कोट 
विपश्‍यना केंद्राच्या जागेचा कुठलाही इशु नाही. जागा हस्तांतरावेळी ठरल्यानुसारच पोलिस चौकी उभारण्याच्या मागणीसाठी पोलिसांचा आग्रह आहे. पोलिस चौकीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून मार्ग काढला जाईल. 
-राधाकृष्णन बी (जिल्हाधिकारी नाशिक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT