residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध,सर्वांनी एकत्र या,आमदार फरांदेचे आव्हान

सकाळवृत्तसेवा

नाशिक : मराठवाड्यातील टंचाई सदृश्‍य परिस्थितीचा विचार करून जलसंपदा विभागाने गंगापूर, दारण, उर्ध्वगोदावरी, मुळा व प्रवरा समुहातील सुमारे बारा टिएमसी पाणी जायकवाडी सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यास आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी तीव्र विरोध केला आहे.

जायकवाडी धरणातील मृत साठा वापरण्याचे सुचविताना नाशिक मधून सहा टिएमसी पाणी सोडल्यास बाष्पीभवनामुळे ना नाशिककरांची तहान भागणार ना मराठवाड्यातील असा दावा करतं मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी आज केले. 

गोदावीर पाटबंधारे विकास महामंडळाची सोमवारी झालेल्या बैठकीत नाशिक मधील गंगापूर धरण समुह व नगर जिल्ह्यातील मुळा व प्रवरा समुहातून प्रत्येकी सहा असे बारा टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला आमदार फरांदे यांनी जोरदार विरोध केला आहे.

जायकवाडी धरणात सद्यस्थितीत सुमारे 69 टिएमसी पाणी जायकवाडी धरणात शिल्लक आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार धरणातील मृत पाणी साठा वापरता येत नसताना देखील सन 2012 पासून मराठवाड्यासाठी तो वापरला जात असल्याने सातत्याने नाशिक मधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागतं आहे.

सन 2016 मध्ये मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दहा टिएमसी पाणी सोडण्यात आले. त्यावेळी सात टक्के बाष्पीभवन दाखविले गेल्याने सात टिएमसी पाणी वाया गेले. आता पुन्हा पाणी सोडल्यास बाष्पीभवन होवून नाशिक मधून पाणी तर जाईलचं शिवाय मराठवाड्याला देखील पाणी मिळणार नसल्याचा दावा करतं आमदार फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. 
 
मेंढीगिरी समितीचा अहवाल चुकीचा 
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळावर औरंगाबादचेचं वर्चस्व असल्याने नाशिककरांना पाण्याच्या बाबतीत न्याय कसा मिळेल? असा सवाल आमदार फरांदे यांनी करताना मेंढीगिरी समितीच्या अहवाल चुकीचा असल्याचा दावा केला आहे. सध्या धरणात मृत व जिवंत असा 69 टक्के पाणी साठा शिल्लक असून पिण्यासाठी व उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याचे मत व्यक्त करतं नाशिक मधून पाणी सोडण्यास विरोध करताना सर्व पक्षियांनी पाणी वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: झारखंडमध्ये स्कूलबसचा मोठा अपघात

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT