residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

मुलीच्या प्रसूतीसाठी आई-बापाचा रुग्णवाहिकेला `दे धक्का!" तळेगावरोही उपकेंद्रातील प्रकार

हर्षल गांगुर्डे

गणुर: ग्रामीण वैद्यकीय सेवा नेहमीच या ना  त्या कारणाने वादात असते. या केंद्राच्या कारभाराविषयी कुणी बोलायलाच नको, हिच यंत्रणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.. चांदवड तालुक्यातील तळेगावरोही उपकेंद्राची  रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने मुलीच्या  प्रसूतीसाठी आई-बापाला रुग्णवाहीकेला धक्का देण्याची वेळ आली,  रग्णवाहिका सुरु न  झाल्याने शेवटी मालवाहतूक गाडीने महिलेला प्रसूतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. 
 

सोनाली नवनाथ नन्नावरे (वय २२) यांना प्रसूती वेदना होऊ लागल्याने (दि.२८) रोजी रात्री अकराच्या सुमारास  तळेगावरोही  प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले.  येथील वैद्यकीय सहायक थेटे यांनी तीस प्रसूतिसाठी दाखल करून घेतले, नैसर्गिकरित्या प्रसूती होईल अशी परिस्थिती असताना पहाटे चार वाजता प्रसूती वेदना जास्त होऊ लागल्याने महिलेस चांदवड उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्याचा सल्ला आरोग्य सहायक थेटे यांनी दिला. यासाठी येथील रुग्णवाहिका जेव्हा सुरु करण्याची वेळ आली तेव्हा सोनाली च्या आई-वडिलांनाच रुग्णवाहिकेला धक्का मारण्याची वेळ आली.  

एकीकडे मुलीला होणाऱ्या असह्य प्रसूती वेदना अन दुसरीकडे आई-बापाला रुग्णवाहिका सुरु करण्यासाठी सुरु असलेली धडपड अर्धा तास होऊन अयशस्वी ठरल्याने अखेर नातेवाईकांच्या मदतीने मालवाहतूक वाहनाने सोनाली हिस चांदवड येथे दाखल करण्यात आले.

गोंडस मुलीला जन्म

 दाखल केल्यानंतर लगेच तिची प्रसूती झाली अन सोनालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.  मात्र या सर्व काळात केवळ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने सोनाली हिस  सुमारे तासभर मरणयातना भोगाव्या लागल्या, हे सर्व टाळण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क करणे गरजेचे असताना तसे न घडता मालवाहतूक गाडीत महिलेला प्रसूतीसाठी चांदवड येथे दाखल करण्याची वेळ येणं म्हणजे ग्रामीण वैद्यकीय सेवेच्या अकार्यक्षमतेचा कळसच म्हणावा लागेल. 

दरम्यान आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने तळेगावरोही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी बनकर यांच्याशी संपर्क साधला असता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगत एकप्रकारे  सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला.  

तळेगावरोही प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती घेतली असता सदर रुग्णवाहिका खरोखर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे. तसा प्रस्ताव देखील जिल्हा   परिषदेच्या   संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. 
-डॉक्टर पंकज ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी 

काळजीचे अश्रू ढाळत आई-बाप लोटत होते रुग्णवाहिका 
दरम्यान भल्या पहाटे रक्त गोठवणाऱ्या थंडीत मुलीला होणाऱ्या जीवघेण्या वेदना आई-बापाच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या होत्या, अशा परिस्थितीत रुग्णवाहिका लोटण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने डोळ्यातले अश्रू ते थांबवू शकले नाही. हि सर्व लाजिरवाणा प्रकार टाळता आला असता मात्र तळेगावरोही प्राथमिक उपकेंद्राचा अकार्यक्षमताच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT