Mahendra Patil
Mahendra Patil Mahendra Patil
उत्तर महाराष्ट्र

आदिवासी आश्रमशाळेचा विद्यार्थी जगविख्यात कंपनीचा बनला डायरेक्टर

जगन्नाथ पाटील

कापडणे : येथील मूळ रहिवासी आणि अमेरिकास्थित (America) महेंद्र पाटील या युवा शास्त्रज्ञाने (Young scientist) जगविख्यात अमेरिकन कंपनी जॉन्सन ॲन्ड जॉन्सनमध्ये (Johnson & Johnson Company) डायरेक्टर (Director) होण्याचा बहुमान मिळवला आहे. दोनशे स्पर्धकांतून त्याने बाजी मारली. नंदुरबार तालुक्यातील आश्रमशाळेच्या या विद्यार्थ्याने गरुडभरारी घेतली आहे. (ashram school became the director a famous company in america)

सातवीपर्यंत इंग्रजीला नो शिक्षक तरीही..!
शास्रज्ञ महेंद्र पाटील यांचे कापडणे मूळ गाव आहे. वडील यशवंत पाटील यांनी शिक्षक म्हणून सोनगीर पाडा या आदिवासी भागात नोकरी केली. त्या आश्रमशाळांमध्येच पाटील यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. विशेष म्हणजे सातवीपर्यंत इंग्रजी विषयासाठी शिक्षकच नव्हते. तरीही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून भरारी घेतली.

धुळ्यात इंजिनिअरिंगचे घेतले शिक्षण

नंदुरबारमधील श्राफ विद्यालयात नववी ते बारावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण झाले. धुळे शहरातील एसएसव्हीपीएसच्या इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतले. १९८८ मध्ये संगणक मॅकेनिकलचे पहिल्या बॅचचे विद्यार्थी पाटील आहेत. त्यानंतर बोस्टन, कल्याण, सिमेन्स, विप्रो, आयबीएम, ईव्हुएस आयबीएनमध्ये त्यांनी नोकरी केली. सात वर्षांपासून जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीत ते व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.

दोनशे स्पर्धकांना मागे टाकले

कमी कालावधीत अधिक काम करणारा रोबो तयार केल्याने जॉन्सनमध्ये त्यांना मानाचे काम मिळाले. त्यानंतर दोनशे स्पर्धकांना मागे टाकत डायरेक्टर पद मिळविले. दरम्यान, पाटील यांच्या यशाबद्दल कापसाचे व्यापारी अरुण पाटील, शिक्षक किशोर पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील आदींनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT