उत्तर महाराष्ट्र

विवाह समारंभात राजकीय मंगलाष्टके! 

सुनील पाटील

चोपडा : व्यासपीठ ना सभेचे ना कोण्या मंत्रीच्या उपस्थितीत कामाच्या शुभारंभाचे. व्यासपीठ होते ते अग्निच्या साक्षीने सात फेरे घेत विवाह बंधनात अडकणाऱ्या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्याचे. पण राजकीय पुढारी जमले की राजकारण घडणारच. लग्न समारंभाचा मंडप असला तरी राजकरणाचे गणित बांधले जातात. असाच अनुभव कुरवेल येथे झालेल्या लग्नसोहळ्यात आला. अर्थात वधू- वरांच्या डोक्‍यावर अक्षदा पडण्याअगोदर राजकीय मंगलाष्टके उधळले गेले. 
जि. प. चे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांचा नातू कुणाल यांचा आज सकाळी अकराला कुरवेल (ता. चोपडा) येथे विवाह संपन्न झाला. या विवाहास जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. याप्रसंगी राजकीय पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत कोपरखळ्या मारल्या. यावेळी लग्न समारंभात एकच हास्यकल्लोळ झाला. लग्नमंडप राजकीय व्यासपीठ झाल्याचा अनुभव आला. गुलाबराव पाटील शिवसेनेचे अध्यक्ष असताना माझी पत्नी जि. प. सदस्या होती. मी त्यांना आपले सरकार बसो अशा शुभेच्छा देतो मी पण तुमचाच आहे. कॅबिनेटमंत्री म्हणून लवकर आपली निवड होवो ही सदिच्छा देत मन तिकीट कथ भी चालस.! अशा शब्दात आपले मत अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी व्यक्त केले. 

पवारांची पॉवर कशी चालते.? 
माजी सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांचे आशीर्वाद पर भाषण देताना सर्वप्रथम चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांनी समोर लोकांमध्ये बसलेले राज्याचे माजी राज्य सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाहून सरकार कोणतेही येवो आपण कॅबिनेटमंत्री निश्‍चित आहात. मंत्रीपद आपले निश्‍चित आहे, असे बोलल्यावर प्रचंड टाळ्यांचा कळकळाट झाला. त्यावर एकच हशा पिकला त्यानंतर स्वतः माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे आशीर्वादपर भाषण देताना म्हणाले, की पवार काय करतील यावर सगळे अवलंबून आहे. परंतु काहीही असले, तरी आमच्या हातात "जोकर' आहे. आम्ही जे ठरवणार तेच होणार असाही टोला त्यांनी यावेळी हाणला. मी मंत्री हो ना हो; जरी केवळ आमदार राहिलो तरी मंत्र्यांकडे जाऊन सर्वसामान्य जनतेचे काम करण्याची धमक माझ्यात असल्याचे ते बोलले. चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांना शिवसेनेकडून जरी हकालपट्टी झाली असली, तरी त्यांनी आज त्यांच्या भाषणातून बोलताना कैलास महाराज असा उल्लेख केला. 

राजकारणात सुबह कही और श्‍याम कही... 
विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते अरुणभाई गुजराथी हे आशीर्वादपर भाषण देण्यासाठी माईक हातात घेतल्यानंतर म्हटले की, गुलाबराव तुमची बढती निश्‍चित आहे. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं. सुबह कही आणि श्‍याम कही अशा प्रकारचा अनुभव त्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. कारण सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत असल्याने सर्व पक्षीय उपस्थितांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. माजी जि. प. सदस्य आनंदराव रायसिंग, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, पं. स. उपसभापती एम. व्ही. पाटील, जि. प. सदस्य डॉ. नीलम पाटील, जिल्हा बॅंक संचालक डॉ. सुरेश पाटील, बी. बी. पाटील, गटनेते जीवन चौधरी, जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा इंदिराताई पाटील, विठ्ठलभाई गुजराथी, शेतकी संघाचे चेअरमन शेखर पाटील, प्रवीण गुजराती, जि. प. सदस्य गोपाळ चौधरी, आरोग्य सभापती दिलीप पाटील, ऍड. भगवान पाटील, पवन सोनवणे, कांतीलाल पाटील, मनोहर पाटील, तुळशीराम पाटील यांच्यासह असंख्य राजकीय नेते आणि पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक राधेश्‍याम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT