crime news
crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मित्र- मैत्रिणींचे मोबाईल चाकूचा धाक दाखवून हिसकावले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : चाकूचा धाक दाखवून मित्र असलेल्या महाविद्यालयीन तरुण व तरुणीचे मोबाईल लुटणाऱ्या दोन संशयितांना पश्चिम देवपूर पोलिसांनी गतीने तपासाअंती गजाआड केले. संशयितांकडून लुटीतील दोन मोबाईल, चाकू व दुचाकी जप्त केली. (Mobile phones of friends were stolen at knifepoint dhule crime)

गोंदूर (ता. धुळे) शिवारात मोराणे ते गोंदूर बायपासवर निकम पॉलिटेक्निकपुढे सपना पोल्ट्री फॉर्मजवळ चार एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चारूदत्त अनिल जोशी (रा. आर्या हॉटेलजवळ, परळी, जि. बीड व ह. मु. विद्याविहार कॉलनी, धुळे) हा मैत्रिणीशी गप्पा मारत उभा होता. त्यावेळी दोन तरुण दुचाकीवरून आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून मित्र- मैत्रिणीचे मोबाईल हिसकावून नेले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

तपासासाठी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, गृहविभागाचे पोलिस उपअधीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस पथकाने तपासाला सुरवात केली. चारुदत्त जोशी याने लुटारूंचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरुन पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने संशयितांचा शोध सुरु केला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

हा गुन्हा देवेंद्र एकनाथ भिल (रा. आनंदखेडे, ता. धुळे) व अजय रूपा सोनवणे (रा. आर्वी, ता. धुळे) याने केल्याचे समजले. त्यांना ताब्यात घेतले. दोघांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी हिसकावलेले बारा हजारांचे दोन मोबाईल दिले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चाकू जप्त केले. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, एम. एच. सय्यद, प्रवीण अमृतकर, किरण जगताप, पुरुषोत्तम सोनवणे, धर्मेंद्र मोहिते, सुनील राठोड, नीलेश हलोरे, रवींद्र हिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस अधीक्षकांचे आवाहन

एकटेपणाचा गैरफायदा घेऊन समाजकंटक गैरकृत्य करण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी निर्जन, निर्मनुष्य ठिकाणी फिरायला जाताना खबरदारी घ्यावी. गैरप्रकार कुणासोबत घडल्यास तत्काळ ११२ क्रमांकावर किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT