monkey
monkey 
उत्तर महाराष्ट्र

पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या माकडाचा मृत्यू 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : पाण्याचा शोधात जंगलातून चुकून गावात आलेल्या माकडाचा जामदा (ता. चाळीसगाव) येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. माकड हा हनुमानाचा अवतार मानला जात असल्याने आज ग्रामस्थांनी माकडाचा मृतदेहाची गावातून सवाद्य मिरवणूक काढून विधिवत अंत्यसंस्कार केले. यानिमित्ताने दहा दिवसांचा दुखवटा देखील ग्रामस्थ पाळणार आहेत. 

जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्याने वन्य प्राणी पाण्याचा शोधार्थ गावाकडे येत आहेत. जामदा (ता. चाळीसगाव) गावाजवळच्या रेल्वे पुलावर आज दुपारी बाराच्या सुमारास एक माकड थांबले होते. त्याचवेळी चाळीसगाकडून धुळ्याकडे जाणारी रेल्वे आल्यानंतर माकडाला रेल्वेची जोरदार धडक बसल्याने ते पुलावरून खाली दगडावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जामदा गावात समजताच घटनास्थळी संपूर्ण गाव जमा झाले. 

मृतदेहाची मिरवणूक 
पाण्याचा शोधात आलेल्या माकडाच्या डोळ्यांसमोरच पाणी होते. मात्र, पाण्यावाचून त्याचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर गावातील महिलांसह ग्रामस्थांनी या माकडाच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेताला. त्यानुसार, मृतदेहाची आरती करून संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. दुपारी अडीचच्या सुमारास जामदा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माकडाच्या अंत्यविधीनंतर ग्रामस्थांनी दहा दिवसांचे सुतक धरले असून त्याचा गंधमुक्तीचा कार्यक्रम ९ एप्रिलला होणार आहे. 

जंगलात पाणवठ्यांची गरज 
सध्या वातावरणात उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थितीत जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले आहेत. पाटणादेवी जंगलातील पाणवठ्यांमध्ये वन्यजीव विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकून वन्यप्राण्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच पद्धतीने प्रादेशिक विभागाच्या अख्यत्यारित येणाऱ्या जंगलांमध्येही अशा प्रकारचे कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT