cremation
cremation 
उत्तर महाराष्ट्र

आईच्या पार्थिवाला ‘चारचौघीं’चा खांदा

सकाळवृत्तसेवा

कापडणे - पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या कापडणे (ता. धुळे) येथे आज मातेच्या पार्थिवाला चार मुलींनी थेट स्मशानभूमीपर्यंत खांदा दिला, तर पाचव्या कन्येने मुखाग्नी देत रुढी-परंपरांना फाटा दिला. यात ग्रामस्थ, भाऊबंदकीचे पाठबळही महत्त्वाचे ठरले.

निवृत्त मुख्याध्यापिका विमलबाई दगाजीराव पाटील यांचे मंगळवारी (ता. ८) निधन झाले. त्यांच्यावर आज धुळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पाचही सुशिक्षित मुलींनी रुढी व परंपरांना झुगारत आईचा अंत्यविधी केला.

मोठ्या चौघा बहिणींनी आईच्या पार्थिवाला खांदा देत थेट स्मशानभूमी गाठली, तर लहान कन्या तथा धुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासन अधिकारी ज्योती पाटील यांनी मुखाग्नी दिला. विमलबाई पाटील यांचे पती दगाजीराव पाटील हे मुख्याध्यापक होते. या दांपत्याचा मुलगा भूषण शालेय वयातच अल्प आजाराने कुटुंबाला सोडून गेला. शिक्षक दांपत्याने पाचही मुलींना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT