Kasara
Kasara 
उत्तर महाराष्ट्र

कसारा घाटात अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले; रेल्वेसेवा विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. खाली असलेली खोल दरी या अपघाताची तीव्रता दर्शवते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याचं रेल्वेने म्हटले आहे.

या अपघातामुळे मध्य रेल्वेवरची मुंबई नाशिक वाहतूक ठप्प झाली आहे. या एक्स्प्रेसमधले सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मध्य रेल्वेचा खोळंबा होणे ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. त्यात सकाळीच हा अपघात झाला, ज्यामुळे मुंबई नाशिक रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT